Ambegaon Pune Crime News | पुणे : पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ शुटिंगही केलं

0

पुणे : – Ambegaon Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या (Pargaon Karkhana Police Station) हद्दीतील एका गावात दोन अल्पवयीन मुलींवर चार जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मुलीवर अत्याचार करतानाचा व्हिडीओ दुसऱ्याला दिला व त्याने तो व्हिडीओ त्यातील एका अल्पवयीन मुलीला दाखवून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल (Molestation Case) असे कृत्य केले.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अवधूत राजू पंचराज, कुणाल कैलास बोराडे व महेश सुभाष तांबे यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर बलात्कार, विनयभंग, आयटी अॅक्ट आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अवधूत, कुणाल आणि महेश यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करुन अत्याचार करण्यात आले. दोन्ही अल्पवयीन मुली घरात एकट्या असताना दोन अल्पवयीन मुले व अवधूत पंचरास, कुणाल बोराडे हे घरी आले. त्यांनी या बहिणीवर आळीपाळीने बलात्कार केला. मुलींनी आरोपींना विरोध केला असता त्यांना हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.

अल्पवयीन मुलगा मुलीवर अत्याचार करत असताना कुणाल बोराडे याने त्याच्या मोबाईलमध्ये घराबाहेरच्या खिडकीतून शूटिंग केले. महेश तांबे याने एका पिडीतेला हा व्हिडीओ दाखवून दुसऱ्या पिडीत मुलीला पुलाजवळ पाठवून देण्यास सांगितले व तिच्या सोबत गैरवर्तन केले. पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यातील अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. तर अवधूत पंचराज, कुणाल बोराडे व महेश तांबे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण फुगे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.