Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : ‘मी इथला भाई’ हातात रॉड घेऊन माजवली दहशत, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

8th June 2024

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून दोघांनी एका तरुणाला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण केली (Marhan). तसेच मी इथला भाई आहे असे म्हणून पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांना शिवीगाळ करुन दहशत पसरवली. हा प्रकार वाल्हेकर वाडी (Walhekarwadi) येथील राजयोग पेट्रोलपंपावर गुरुवारी (दि.6) रात्री नऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकाला अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत देबाशीस दुल्लाल हालदार (वय-22 रा. राजयोग कॉलनी, वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अरबाज अरिफ शेख (वय-24 रा. एकता कॉलनी) व त्याच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 326, 323, 504, 506, 34 सह क्रिमीनल लॉ अॅमेन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचे पूर्वी वाद झाले होते. गुरुवारी रात्री फिर्यादी हे पेट्रोलपंपावर काम करत असताना पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी पेट्रोलपंपावर आले. अल्पवयीन मुलाने त्याच्या शर्टच्या आत लपलेला स्टीलचा रॉड बाहेर काढून फिर्यादी यांच्य हातावर मारुन जखमी केले. तर फिर्य़ादी यांचा सहकारी कामगार सम्राट याच्या हातावर मारुन त्यालाही जखमी केले.

आरोपी अरबाज याने अल्पवयीन मुलाच्या हातातून रॉड घेऊन हवेत फिरवून मोठमोठ्याने ओरडून म्हणाला, मी अरबाज कुरेशी इथला भाई आहे असे म्हणून पेट्रोलपंपावर येणाऱ्या ग्राहकांना मोठमोठ्याने शिवीगाळ करुन आमच्या भांडणात कोणी येऊ नका, नाहीतर मी त्याला सोडणार नाही, असं धमकावून ग्राहकांमध्ये दहशत निर्माण करुन पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.