Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0

पुणे : – Pune Crime News | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याप्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. यात अल्पवयीन मुलींवरही अत्याचार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. पिडीत मुलगी 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. (Minor Girl Rape Case)

याबाबत पिडीत मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून जस्सू (वय-22 रा. मथुरा, उत्तर प्रदेश पुर्ण नाव माहिती नाही) याच्यावर आयपीसी 376, 376/2/जे/एन, पोक्सो अॅक्ट नुसार (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील बांधकाम साईटवर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलगी एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने मुलीला ‘मी तुझ्यासोबत लग्न करतो, तुला गावी घर बांधून देतो’ असे सांगून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आंबेगाव येथील कन्स्ट्रक्शन साईटवरील एका खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पिडीत मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.