Maval Pune Crime News | मावळ : कान्हे फाटा येथील मटका अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त; 7 जणांविरोधात गुन्हा नोंद

0

मावळ : – Maval Pune Crime News | कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील (Kanhe Phata Railway Station) आबा सातकर यांच्या चाळीत सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर (Mataka) सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक (IPS Satya Sai Karthik) यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांविरोधात वडगाव मावळ पोलीस ठाण्यात (Vadgaon Maval Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.7) करण्यात आली. (Police Raid On Gambling Den)

काळूराम पांडुरंग लालगुडे (वय ३१ रा.कुसगाव, ता. मावळ,जि पुणे), कृष्णा धारोबा जाधव (वय २४ रा. कान्हे फाटा, तालुका मावळ जिल्हा पुणे), किसन जवेरी कोळी (वय ६५ रा कान्हे फाटा, ता.मावळ जि.पुणे), विलास सोपान बोरडे (वय ५८ रा. कान्हे फाटा, ता.मावळ, जि पुणे), किरण विजय यादव (वय ३२ रा.कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे), राकेश जेकुप्रसाद यादव (वय ५८ रा.कान्हे फाटा, मावळ जिल्हा पुणे) हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले. मटका अड्ड्याचा मालक मदन वाजे (रा.तळेगाव दाभाडे पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे. त्यावरून त्यांनी त्यांच्या पथकाला त्या ठिकाणी पाठवले. कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ, आबा सातकर यांचे चाळीतील खोली समोरील मोकळ्या जागेत पथकाने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले. आरोपी कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांचेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये हा मटका अड्डा हा मदन वाजे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींकडून रोख रक्कमेसह एकूण 92 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम च्या विविध कलमान्वये सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार अंकुश नायकुडे,  नितेश (बंटी) कवडे, गणेश येळवंडे व वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.