Kondhwa Pune Crime News | पुणे : सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | पुण्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोंढवा परिसरातील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन (Obscene Behavior) करुन विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे (Molestation Case). हा प्रकार गुरुवारी (दि.6) रात्री साडेसात ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान घटला आहे. याप्रकरणी एका नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.7) कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी हुझेफा पठाण (रा. कोंढवा) याच्यावर आयपीसी 354 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोक्सो अॅक्ट) कलम 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे (POCSO Act). पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये राहतो. गुरुवारी सायंकाळी फिर्य़ादी यांची मुलगी तिच्या मित्रासोबत सायकल खेळण्यासाठी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गेली होती.

सोसायटीच्या पार्कींगमध्ये सायकल खेळत असताना सायकल मध्ये धागा अडकला. धागा कापण्यासाठी मुलीने घरातून कैची घेऊन आली. कैचीने धागा कापत असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने मुलीच्या हातातून कैची घेऊन तिला बिल्डींगच्या पार्कींगमध्ये घेऊन गेला. तुला कैची देतो असे सांगून त्याठिकाणी कोणी नसल्याचे पाहून मुलीला जवळ ओढून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.