Kalyani Nagar Pune Crime News | पुणे : तरुणीसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

0

पुणे : – Kalyani Nagar Pune Crime News | ऑनलाईन मागवलेले पार्सल देण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरी जाऊन तिच्या सोबत असभ्य वर्तन (Rude Behavior) करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे (Molestation case). हा प्रकार कल्याणीनगर परिसरात गुरुवारी (दि.6) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडला असून येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे.

याबाबत 28 वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी विक्रम लक्ष्मण वाघ Vikram Laxman Wagh (वय-25 रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, कल्याणी नगर) याच्यावर आयपीसी 354, 354(अ)(1)(3), 354(ड), 509 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी या कल्याणीनगर परिसरातील एका सोसायटीत राहत असून त्या ठिकाणी आरोपी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

तरुणीने अमेझॉन वरून काही सामान मागवले होते. गुरुवारी सायंकाळी तरुणीने मागवलेले सामान सुरक्षा रक्षक विक्रम वाघ याने घेतले. ते सामान देण्यासाठी आरोपी तरुणीच्या फ्लॅटवर गेला. आरोपीने तरुणीच्या फ्लॅटमध्ये येऊन अश्लील हावभाव केले. तसेच तरुणीला अश्लील स्पर्श करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत तरुणीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.