Yerawada Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार अन् बदनामी करण्याची धमकी

पुणे : – Yerawada Pune Crime News | तरुणीसोबत ओळख करुन तिच्यासोबत मैत्री केली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) वेळोवेळी शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केल्यावर बदनामी करण्याची धमकी (Threat Of Defamation) देऊन लग्नास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या तक्रारीवरुन येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 28 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.5) येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन प्रणय दिलीप जाधव Pranay Dilip Jadhav
(वय-28 रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2018 ते 5 जून 2024 या कालवधीत येरवडा परिसरात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी 2018 मध्ये येरवडा परिसरात राहण्यास गेली. 2018 मधील गणपती उत्सवा दरम्यान फिर्यादी यांची आरोपीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. त्यानंतर प्रेमात झाले. आरोपीने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच घरात एकटी असताना आरोपीने घरी येऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पिडीत मुलीने प्रणय याच्याकडे लग्नामाबाबत विचारणा केली असता त्याने तिला धमकावले.
मी न्युज पेपरमध्ये नोकरीला आहे, तु वेश्या व्यवसाय करते, तुझी बातमी छापून बदनामी करेल, मग बघ तुझ्यासोबत कोण लग्न करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रणय याने फिर्यादी यांना विश्वासात घेऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करीत आहेत.