Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना NDAमध्ये आणण्यासाठी BJP कडून प्रयत्न सुरु?

0

मुंबई: Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election Results 2024) राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठे यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवत चांगले पुनरागमन केले आहे. भाजपने ४०० पार चा नारा दिलेला होता मात्र BJP ला २७२ चा मॅजिक आकडाही पार करता आला नाही.

सध्या एनडीए दिल्लीत सत्तास्थापनेचा विचार करत आहे. अशातच आता एक मोठी घडामोड समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनडीए मध्ये परत यावे यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. एका केंद्रीय मंत्र्याकडे उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक निकालानंतर भाजपाने नव्या मित्र पक्षांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून उद्धव ठाकरेंना परत एनडीएमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

भाजपा आणि शिवसेना यांची महाराष्ट्रात २५ वर्षांपेक्षा जास्त युती होती. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावर ही युती तुटली. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अडीच वर्षांनी शिवसनेत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आमदारांचा मोठा गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपाच्या पाठिंब्यावर सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.