Stock Market News | NDA ला ग्रीन सिग्नल मिळताच बाजारही झाला Green, जोरदार तेजीसह Sensex पुन्हा 75000 च्या पुढे

मुंबई : Stock Market News | शेयर बाजारात (Stock Market) मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशी (Election Result Day) आलेल्या त्सुनामीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी जोरदार तेजी आली होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही इंडेक्स वेगाने रिझल्ट-डेची रिकव्हरी करताना दिसले. तर बुधवारी एनडीएच्या बैठकीत सरकारला ग्रीन सिग्नल मिळाल्याचा परिणाम गुरुवारी शेयर मार्केटवर सुद्धा दिसून आला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअर्सचा Sensex सुमारे ७०० अंकाच्या जोरदार तेजीसह पुन्हा एकदा ७५००० च्या पुढे गेला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा Nifty 50 सुद्धा १५० अंकापेक्षा जास्तीच्या वेगाने खुला झाला आहे.

७५ हजारच्या पुढे उघडला सेन्सेक्स
शेयर मार्केटमध्ये सकाळी ९.१५ वाजता व्यवहाराची सुरूवात हिरव्या निशाणीवर झाली. बीएसई सेन्सेक्स ६९६ अंकाच्या उसळीसह ७५,०७८ च्या पातळीवर खुला झाला, तर एनएसई निफ्टीसुद्धा सेन्सेक्ससोबत १७८ अंकाच्या वेगाने २२,७९८ वर खुला झाला. बाजार उघडल्यावर बीएसईच्या ३० पैकी ८ शेयरमध्ये घसरण तर २२ शेयरमध्ये तेजी दिसून आली. सर्वात जास्त एनटीपीसी शेअर्स वधारला आणि तो सुरुवातीच्या व्यवहारात ३.७२ टक्केच्या उसळीसह ३५३.६५ रुपयावर व्यवहार करत होता.

बुधवारी आली होती अचानक तेजी
यापूर्वी मंगळवारच्या भयंकर घसरणीनंतर बुधवारी शेयर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. मार्केट बंद होताना बीएसई सेन्सेक्स २३०० अंकाने वाढून ७४,३८२.२४ वर बंद झाला होता, तर निफ्टी ७३५.८५ अंकाने वाढून २२,६२०.३५ वर बंद झाला होता. याशिवाय बँक निफ्टीमध्ये शानदार तेजी राहिली. तो २,१२६ अंक वाढून ४९,०५४ लेव्हलवर बंद झाला होता. तसेच, मिडकॅप आणि स्‍मॉल कॅप इंडेक्‍समध्ये सुद्धा जबरदस्त तेजी राहिली.

७४ शेयरला लागले अपर सर्किट
बुधवारी बीएसई सेन्सेक्सचे टॉप ३० शेयर हिरव्या निशाणीवर बंद झाले. सर्वात जास्त तेजी इंडसइंड बँकमध्ये ७.७५ टक्के होती. यानंतर टाटा स्‍टील, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आणि अ‍ॅक्सिस बँकेत ७ टक्के तेजी राहिली.

सर्वात कमी वाढ एल अँड टीच्या शेयरमध्ये केवळ ०.२० टक्के झाली होती. इतकेच नव्हे तर एनएसईच्या २,७७१ शेयरपैकी आज १,९५६ शेयरने उसळी घेतली, तर ७२१ शेयरमध्ये घसरण झाली. ९४ शेयर अनचेंज राहिले. ६९ शेयर ५२ आठवड्याच्या हाय लेव्हलवर व्यवहार करत होते, तर ८९ शेयर ५२ आठवड्याच्या लो लेव्हलवर होते. ७४ शेयरमध्ये अपर सर्किट राहिले तर २६७ शेयरमध्ये लोअर सर्किट होते.