Shivaji Nagar Pune Crime News | पुणे : जादा परतावा देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 16 लाखांची फसवणूक, शहरात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

पुणे : – Shivaji Nagar Pune Crime News | सायबर गुन्हेगार (Cyber Thieves) नागरिकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत आहेत. पोलिसांकडून आवाहन करुन देखील नागरिक सायबर चोरट्यांच्या भुलथापांना बळी पडत असून त्यांची लोखो रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) होत असल्याचे समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांनी एका ज्येष्ठ नागरिकाला जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून 15 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकासोबत फोनवर ओळख केली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन केला. जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यात पैसे जमा केले मात्र, त्यानंतर कोणताच परतावा किंवा गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस करीत आहेत.
रिक्षाचालकाने घेतला महिलेच्या अंध पणाचा गैरफायदा
पुणे : रिक्षा चालकाने एका महिलेच्या अंधत्वाचा व वयाचा गैरफायदा घेऊन पंधरा हजार रुपयांची फसवणूक केली. संबंधीत महिला ससून हॉस्पिटलमधून घरी जात असताना तिने रिक्षाचालकाला थांबण्यास सांगून त्याला एटीएम मधून पैसे काढून आणण्यास सांगितले. त्यासाठी रिक्षा चालकाकडे एटीएम आणि पीन नंबर दिला. त्यानंतर रिक्षा चालकाने महिलेला घरी सोडले. महिला रिक्षाचालकाला सुट्टे पैसे देण्यासाठी घरातून सुट्टे पैसे आणण्यासाठी गेली. त्यावेळी रिक्षा चालकाने पर्स मधून एटीएम कार्ड चोरून एटीएममधून पैसे काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेच्या 45 वर्षीय मुलीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे करीत आहेत.