Prayeja City in Vadgaon Budruk Pune Accident | धक्कादायक: वडगावच्या प्रयेजा सिटीसमोरील रस्त्यावर एका महिलेला ट्रकने चिरडल्याची घटना

0

पुणे: Prayeja City in Vadgaon Budruk Pune Accident | पुणे सिंहगड रोडवरील (Sinhagad Road Pune) प्रयेजा सिटीजवळील आरएमसी प्लांटमध्ये एका महिलेला ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना ६ जून (गुरुवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. या अपघातांनंतर ट्रकचालक फरार झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

स्थानिक नागरिकांनी पुणे शहर पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांचे पथक अपघातस्थळी पोहोचले. मृत महिला बांधकाम कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक प्रयेजा सिटी परिसरात बेकायदेशीर सिमेंट प्लांटमुळे रस्त्यावर पसरलेली खडी आणि धूळ यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. यामुळे तेथील रहिवाश्यांना, लहान मुलांना डोळ्यांचा आणि श्वसनाच्या त्रास होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि प्लांटचालक यांचे संगनमत करून कोणतीही अडचण नसल्याचे भासवत असल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे.

स्थानिक नगरसेवकांपासून ते महापौर, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे मनपा आयुक्त यांच्याकडे प्रत्यक्ष आणि मेलद्वारे तक्रार करूनही याठिकाणी अजून एक प्लांट तयार केला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.