Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : शिवानी अग्रवाल यांच्यासह ससून मधील डॉक्टरांच्या पोलीस कोठडीत वाढ

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | संपूर्ण देशाच चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणात न्यायालयाने शिवानी अग्रवाल (Shivani Vishal Agarwal) आणि विशाल अग्रवाल (Vishal Surendra Kumar Agarwal) या दोघांना 5 जूनपर्य़ंत पोलीस कोठडी दिली होती. यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज (बुधवार) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 10 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर अपघाताप्रकरणी आज कोर्टाने शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच ससून रुग्णालयातील तीन आरोपींना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Halnor) आणि अतुल घाटकांबळे यांचा समावेश आहे. यामुळे शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Porsche Car Accident Pune)

कल्याणी नगर अपघात प्रकरणात पोलिसांनी आधी विशाल अग्रवाल याला अटक केली होती. त्यानंतर शनिवारी (1जून) याच प्रकरणात शिवानी अग्रवाल यांनाही अटक केली. त्यांनीच ससून रुग्णालयात जाऊन स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले होते, असे चौकशीतून समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल असता दोघांनाही 5 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्याची मुदत बुधवारी (दि.5) संपली.

तर ब्लड अहवालात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरेंसह तिघांना अटक केली. याप्रकरणी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 5 जुन पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ही मुदत संपल्यावर या तिघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, 7 जून पर्यंत पोलीस कोठडी कोठडी देण्यात आली आहे. अपघात व ब्लड फेरफार प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि शिपायास 27 मे ला अटक केली होती.