Bundgarden Pune Crime News | पुणे : बँक अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन

पुणे : – Bundgarden Pune Crime News | बँक अधिकाऱ्याकडून बँकेत शिपाई म्हणून काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तन करुन विनयभंग केला (Molestation Case). हा प्रकार मागील दोन ते तीन महिन्यापासून ते 28 मे रात्री दहाच्या दरम्यान बंडगार्डन येथील एका बँकेत आणि महिलेच्या मोबाईलवर घडला आहे. याप्रकरणी बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 43 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) बुधवारी (दि.5) फिर्याद दिली आहे. यावरून नयनेश वाजकर मोनं (अंदाजे वय -50) याच्यावर आयपीसी 354, 509, 506 नुसार दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे (PSI Chetan Dhanawade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका नॅशनल बँकेत शिपाई म्हणून काम करतात. तर आरोपी नयनेश मोनं हा बँकेत सिनिअर क्लार्क पदावर कार्यरत आहे.
फिर्यादी महिला बँकेत काम करत असताना एक महिन्यापूर्वी आरोपीने महिलेसोबत असभ्य वर्तन करून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुठे तक्रार केली तर बघुन घेईन अशी धमकी दिली. 28 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपीने फिर्य़ादी यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर व्हॉईस कॉल केला. महिलेसोबत अश्लील भाषेत बोलून फोनवर कीस देण्याची मागणी करुन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेने बुधवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून तपास सुरु असल्याचे पीएसआय चेतन धनवडे यांनी सांगितले.