Basava Jyothi Sandesh Yatra In Pune | पुण्यात ‘बसव ज्योती’ यात्रेचे उत्साहात स्वागत

0

– Basava Jyothi Sandesh Yatra In Pune | कर्नाटकातील बसवकल्याणहून दक्षिण अफ्रिकेला निघालेल्या ‘बसव ज्योती’ यात्रेचे लिंगायत समाजातर्फे (Lingayat Community) पुण्यात बाजीराव रोड (Bajirao Road Pune) येथील महात्मा बसवण्णा पुतळा परिसरात उत्साहात स्वागत करण्यात आले. दक्षिण अफ्रिकेत महात्मा बसवण्णा, महात्मा गांधी व नेल्सन मंडेला यांच्या कार्यावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत बेंगलोर येथील चन्नबसवानंद स्वामी व बसवकुमार पाटील सहभागी होणार आहेत. परिषदेच्या प्रसारासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.

चन्नबसवानंद स्वामी यांनी याबद्दल सांगितले की, महात्मा बसवण्णा यांनी बाराव्या शतकात केलेल्या कार्याची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाऊ लागली आहे. दक्षिण अफ्रिकेत होणार्या परिषदेत यावर सविस्तर चर्चा होणार आहे. दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये अशा प्रकारच्या परिषदांचे आयोजन करण्यात येते. पुढील वर्षी मे महिन्यात लंडनमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली. यावेळी कोथरूड येथील गांधी भवनचे सचिव संदिप बर्वे यांची विशेष उपस्थिती होती.

विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांच्या जयघोषात बसव ज्योती यात्रेचे स्वागत करण्यात आले. सुरूवातीला स्वामी चन्नबसवानंद यांच्या हस्ते बसवण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बसवण्णा यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. सामूहिक प्रार्थना संपन्न झाली. चन्नबसवानंद स्वामी, बसवकुमार पाटील, बर्वे यांना लिंगायत समाजातर्फे सन्मानित करण्यात आले. बर्वे, पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थितांनी बसव ज्योतीचे दर्शन घेतले. यावेळी लिंगायत समाजातील बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.