Akhilesh Yadav | चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांना आघाडीत आणण्याचे अखिलेश यादवांकडून प्रयत्न

दिल्ली: Akhilesh Yadav | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला अपेक्षित यश मिळालेलं नाही. एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात होता. पण प्रत्यक्ष एनडीएला ३०० चा आकडा गाठता आलेला नाही.
दरम्यान आता दिल्लीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली चालू झाल्या आहेत. देशात आम्हीच सत्ता स्थापन करू अशा दावा एनडीए कडून केला जातोय.
तर दुसरीकडून इंडिया आघाडीतही घडामोडींना वेग आला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती. त्यामुळे ते अपमानाचा बदला घेणार का? अशी चर्चा होत आहे.
नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या पक्षामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होते. पण लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसाआधीच त्यांनी एनडीए चा हात धरलेला होता. आणि त्यामुळे नितीश कुमार सुद्धा पुन्हा एकदा इंडिया आघाडीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे. याच दोघांच्या जोरावर इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापनेची तयारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
अखिलेश यादव ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सपाचे ३५ पेक्षा जास्त याठिकाणी खासदार निवडून आले. त्याच अखिलेश यादव यांच्यावर या दोघांची मने वळवण्याची जबाबदारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिल्यास चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीसोबत येण्यावर विचार करू शकतील, अशी इंडिया आघाडीला अपेक्षा आहे. या सर्व गोष्टी जुळून आल्यास देशात इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते.