Monsoon In Maharashtra | पुढील चार दिवसांपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

पुणे: Monsoon In Maharashtra | राज्यात धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून कधी दाखल होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हवामान विभागाकडून (India Meteorological Department-IMD) याबाबत महत्वाची अपडेट देण्यात आली आहे. मान्सून महाराष्ट्राच्या वाटेवर असून पुढील चार ते पाच दिवसात तळकोकणात दाखल होणार आहे.

मान्सूनने सोमवारी कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशच्या आणखी काही भागात प्रवेश केल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील चार दिवसांपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे.

केरळमध्ये वेळेआधी (३० जून) दाखल झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल सुरूच आहे. रविवारी (ता. २) दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली.

संपूर्ण केरळ, तमिळनाडू व्यापून वाऱ्यांनी दक्षिण कर्नाटकातील मंगळूर, चित्रदुर्ग ते आंध्र प्रदेशातील नेल्लूरपर्यंत मजल मारली होती.

बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने प्रगती केली. मॉन्सूनच्या वाटचालीचा वेग सोमवारी (ता. ३) सुरूच होता. मोसमी वाऱ्यांनी कर्नाटकातील होन्नावर, बेल्लारी, आंध्र प्रदेशातील कर्नूल, तेलंगणमधील नरसापूरपर्यंत प्रगती केली आहे .