Lok Sabha Election Results 2024 | NDA च्या काठावरच्या बहुमताने काँग्रेसच्या आशा पल्लवित; नितीशकुमार आणि टीडीपीशी चर्चेच्या तयारीत

0

मुंबई: Lok Sabha Election Results 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवडणुकीपूर्वी ४०० चा आकडा पार करण्याचा नारा दिला होता. मात्र, आज देशभरात मतमोजणी होत असताना भाजप केवळ २५० जागांवर अडकल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत भाजप स्वबळावर सरकार स्थापन करू शकणार नाही.

ही परिस्थिती पाहता भाजपप्रणित एनडीए (NDA) आघाडीला काठावरचे बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर २७२ इतकी आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता एनडीए आघाडी बहुमताचा आकडा जेमतेम गाठेल, असे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सक्रिय झाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी बोलणी केली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. काँग्रेसने तेलुगू देसम आणि नितीश कुमार (Nitesh Kumar) यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केल्यास भाजप काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आंध्र प्रदेशात तेलुगू देसमचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत. तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. २७२ चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला मित्रपक्षांची गरज भासणार आहे.

शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात आजपर्यंत महत्त्वाची भूमिक बजावली आहे. आता ते राष्ट्रीय पातळीवरही काही वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.