Kalyani Nagar Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करणाऱ्या दोघांना अटक, पुणे गुन्हे शाखेची मुंबईत कारवाई

0

पुणे : – Kalyani Nagar Car Accident Pune | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार (Blood Sample Tampering Case) करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) अटक केली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईतून दोघांना अटक केली आहे. (Porsche Car Accident Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) अल्पवयीन आरोपीच्या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. यामध्ये आरोपींचा हात होता, अशी माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने मुंबई (Mumbai) येथे कारवाई करुन अश्फाक मकानदार व अमर गायकवाड यांना अटक केली आहे. पुण्यात अपघात झाल्यानंतर अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. ते तपासण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र, रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यात आले होते.

फेरफार प्रकरणात ससून ससून हॉस्पिटलचे डॉ. अजय तावरे (Dr. Ajay Taware), डॉ श्रीहरी हळनोर (Dr Shrihari Holnor), वॉर्डबॉय अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल (Shivani Vishal Agarwal) ही संशयित आरोपी होती. शिवानी यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कट रचल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी तिच्याकडे चौकशी करुन ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत मुलाच्या रक्ताच्या नमुन्या ऐवजी माझ्या रक्ताचे नमुने दिले आहेत, अशी कबुल शिवानीने स्वत: पोलिसांना दिली. त्यानंतर या प्रकरणात मकानदार आणि गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.