Hadapsar Pune Crime News | पुणे : मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्याच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार

4th June 2024

पुणे : Hadapsar Pune Crime News | मैत्रिणीसोबत असलेला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार (Rape Case Pune) केल्याची घटना घडली आहे. तसेच विवाहितेला धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत हडपसर परिसरात घडला आहे. याप्रकरणी धाराशिव येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Rape On Married Woman)

याबाबत 27 वर्षीय विवाहित महिलेने सोमवारी (दि.3 जून) हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन ब्रह्मदेव विठ्ठल मांजरे Brahmadev Vitthal Manjre (वय-26 रा. परांडा जि. धाराशिव) याच्यावर आयपीसी 376, 376/2, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांचे त्यांच्या मैत्रिणीसोबत वाद झाले होते. आरोपीने मैत्रिणीसोबत झालेले वाद मिटवण्यासाठी फिर्यादी यांना हडपसर येथे बोलावून घेतले.

फिर्यादी हडपसर येथे आल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. तसेच आरोपीने त्याच्या खोलीवर नेऊन महिलेसोबत संबंध ठेवून त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ व फोटो काढले. ते फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच पतीची नोकरी घालवण्याची धमकी देऊन पतीवर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमुद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.