Alandi Pune Crime News | पिंपरी : ‘मी भाई आहे’ व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या स्वयंघोषित भाईला बेड्या
पिंपरी : – Alandi Pune Crime News | फरसाण दुकानातून खरेदी केलेल्या सामानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला दगडाने मारहाण केली. तसेच ‘मी मरकळचा भाई’ असे असे म्हणून दुकानातून जबरदस्तीने सामान घेऊन जाणाऱ्या भाईच्या आळंदी पोलिसांनी (Alandi Police Station) मुसक्या आवळ्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.2) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मरकळ येथील लक्ष्मी मंगल्म फरसाण दुकानात घडला. (Attack On Shop Owner)
याबाबत देवीप्रसाद जोखोराम गुप्ता (वय-27 रा. कमळजाई वस्ती, मरकळ ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन गणेश कुंडलिक लोखंडे याला अटक केली आहे. तर त्याच्या इतर तीन साथीदारांवर आयपीसी 385, 324, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे मरकळ येथे फरसाण दुकान आहे. आरोपी फिर्यादी यांच्या दुकानातून सहाशे रुपयांचे सामान घेऊन जात होते. त्यावेळी फिर्यादी यांनी सामानाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपीने मी मरकळचा भाई आहे असे म्हणून फिर्य़ादी यांना हाताने मारहाण केली. तर इतर आरोपींनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
जुन्या भांडणातून कुकरीने वार
भोसरी : जुन्या भांडणाचा राग मनात धरुन रिक्षाचालकावर चाकुने (कुकरी) वार करुन जखमी केले. हा प्रकार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कासारवाडी येथील कब्रस्तान रोडवर घडला आहे. याप्रकरणी सायबु सुखदेव कोळी (रा. कासारवाडी) याच्यावर आयपीसी 307, 341 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आदिल करिम शेख (वय-30 रा. वंजारी चाळ, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.