Monsoon Update-Pune Rains | मान्सून तळकोकणात 4 जूनला प्रवेश करणार; पुण्यात 6 जूनला ‘आनंद सरी’

0

पुणे: Monsoon Update-Pune Rains | यंदाच्या उन्हाळ्यात रेकॉर्ड ब्रेक पारा उंचावल्याने अक्षरशः नको नको झाले आहे. देशात उष्णतेमुळे जिवाची लाही लाही झाली. असे असतांना पाऊस कधी येणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे.

भारतीय हवामान विभागाने India Meteorological Department (IMD) मान्सून बाबत महत्वाची अपडेट दिली आहे. येत्या ४ जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल होणार आहे. असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

“जून महिना सुरू झाल्याने या महिन्यात जो पाऊस पडेल, तो मॉन्सूनचा समजला जाईल. त्याची नोंद होणार आहे. त्यामुळे जून ते सप्टेंबर दरम्यान जो पाऊस पडेल, त्यात आजपासून होणाऱ्या पावसाचा समावेश होईल. राज्यात काही भागात मॉन्सून पोहोचलेला नसला तरी देखील तो पाऊस मॉन्सूनचा समजला जाईल.

सध्या पं. बंगालच्या काही भागात आणि केरळच्या पुढे जाण्यासाठी मॉन्सूनला पोषक वातावरण आहे. त्यामुळे गोव्यामध्ये ३ जून रोजी, तळकोकणात ४ जून रोजी तर पुण्यात ६ जून रोजी दाखल होऊ शकेल.” असे डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ, आयएमडी, पुणे यांनी सांगितले आहे.

रेमल’ या चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरावरील मॉन्सून सक्रिय झालेला आहे. त्यामुळे मॉन्सूनाला कुठेही अडथळा येणार नाही. मॉन्सूनची केरळच्या पुढील वाटचाल चांगल्या रितीने होणार आहे.

मॉन्सूनने यावर्षी अकरा दिवस अगोदरच पूर्वोत्तर राज्यांसह सिक्कीम आणि पश्चिम बंगालपर्यंत मजल मारलेली आहे. मॉन्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील दोन्ही शाखा रविवारपासून (दि.२) अधिक बळकट होतील. परिणामी मॉन्सूनचा वेग चांगला राहील, असा अंदाज देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.