Bopdev Ghat Pune Crime News | पुणे : बोपदेव घाटात तरुणाला धमकावून दुचाकी नेली चोरून

31st May 2024

पुणे : – Bopdev Ghat Pune Crime News | पुण्यातील बोपदेव घाटात दुचाकीस्वारांना आणि फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना लुटण्याच्या (Robbery In Bopdev Ghat) घटना वारंवार घडत आहेत. गावकडून पुण्यात येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला अडवून त्याला मारहाण करण्याची धमकी देऊन त्याच्याकडील दुचाकी घेऊन 3 चोरटे पसार झाले (Vehicle Theft) . तसेच तरुणाच्या घरमालकाला फोन करुन दहा हजार रुपये घेतले. हा प्रकार 27 मे रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत सतिश जगन्नाथ सरगर (वय-32 रा. वाकड-हिंजवडी रोड, वाकड) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश सरगर हे त्यांच्या बजाज पल्सर (एमएच 14 ई.एस. 8295) वरुन गावकडून वाकड येथे येत होते. बोपदेव घाटातील टेबल पॉईंटच्या पुढील तिसऱ्या वळणावर तीन चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. सतीश यांना मारहाण करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील गाडी, मोबाईल व इतर वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन येवलेवाडीच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर चोरट्यांनी सतीश यांच्या घरमालकाला फोन केला. चोरट्यांनी घरमालकाला गाडी आणि मोबाईल फोनच्या बदल्यात दहा हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसिना शेख करीत आहेत.