Blood Sample Temparing Case | पुणे हिट अँड रन प्रकरण : ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी ससूनच्या नर्स पुणे पोलिसांच्या ‘रडार’वर

0

पुणे :- Blood Sample Temparing Case | पुणे ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह (Pune Drink & Drive Case) प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. यातच ससून रुग्णालयाचा कारभार समोर आला आहे. डॉ. अजय तावरे (Dr Ajay Taware), डॉ. श्रीहरी हाळनोर (Dr Shrihari Halnor) यांनी अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लडचे सॅम्पल बदलले. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच ससूनचे डीन डॉ. विनायक काळे (Dr Vinayak Kale) यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आता याच प्रकरणात पुणे पोलीस (Pune Police) प्रत्येकाची कसून चौकशी करत आहेत. आता ससून रुग्णालयातील दोन ते तीन नर्सची (Nurses at Pune’s Sassoon Hospital) पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

ब्लड सॅम्पल हेराफेरी प्रकरणात आता ससून हॉस्पिटलमधील काही नर्सला चौकशीसाठी पुणे पोलिसांनी बोलवलं. ज्यावेळी ब्लडमध्ये फेरफार करण्याचा प्रकार घडला. त्यावेळी तावरे आणि हाळनोर यांच्यासोबत दोन ते तीन नर्स देखील असल्याची माहिती आहे. ज्यावेळी सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) पोलिसांनी तपासले त्यात या नर्स दिसत आहेत. त्यामुळे या नर्सचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. तावरे आणि हाळनारे याच्यासोबत असणाऱ्या नर्सला पुणे पोलिसांनी आयुक्तालयात (Pune CP Office) चौकशीसाठी बोलवलं आहे.

ब्लड फेरफार प्रकरणावरुन अनेक चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणात ससूनमधील नेमकं कोण कोण सहभागी आहे. असे प्रकार किती दिवसांपासून करत आहेत. यासाठी किती किंमत मोजली जात आहे आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरुन ससूनमध्ये केले जात आहेत, याची संपूर्ण चौकशी पुणे पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. यामध्ये शिपायापासून ते वरिष्ठांपर्यंत सर्वांची चौकशी केली जात आहे. त्यामुळे नर्सला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.