Pune Nagar Road Accident News | पुण्यात पुन्हा भीषण अपघात, ट्रकने दुचाकीला फरफटत नेलं; दोघांचा जागीच मृत्यू

0

पुणे :- Pune Nagar Road Accident News | कल्याणी नगर येथील अपघाताची (Kalyani Nagar Accident) घटना ताजी असतानाच पुणे-नगर रोडवर सोमवारी (दि.27) रात्री साडे दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खराडी जकात नाका (Kharadi Jakat Naka) येथे भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले. त्यात दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले दोन्ही महाविद्यालयीन युवक मुळचे लातूरचे असून ते सध्या वाघोली (Wagholi) येथे शिक्षण घेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहतूक करणारा ट्रक वाघोलीतून पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी खराडीतील जकात नाका चौकात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. शामबाबू रामफळ गौतम असे ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तर मृतांपैकी एकाचे नाव आदिल शेख असून इतर दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जकात नाक्यावर सिग्नलला दुचाकी थांबवली होती. त्या दुचाकीला ट्रकने जोरात धडक दिल. दुचाकीवर असलेले तिघेही या ट्रक सोबत फरफटत गेले. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेत आरोपी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.