Hasan Mushrif Warned MLA Ravindra Dhangekar | मंत्री मुश्रीफ यांच्यावर धंगेकरांचे गंभीर आरोप; आरोपांवर माफी न मागितल्यास बदनामीचा दावा करण्याचा इशारा

पुणे: Hasan Mushrif Warned MLA Ravindra Dhangekar | पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील (Porsche Car Accident Pune) अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार (Blood Sample Collection) केल्याबाबत ससून मधील दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर (Dr Ajay Taware – Dr Shrihari Halnor Arrest ) या दोघांना या दोघांना ताब्यात घेतले.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार ससून रुग्णालयातील पहिलाच रिपोर्ट पुणे आरोपीने नशा न केल्याचा आल्याने या प्रकरणांमध्ये संशय वाढला होता.

त्यामुळे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने पुन्हा एकदा घेत ते खबरदारीचा उपाय म्हणून औंधमधील सरकार रुग्णालयामध्ये दिले होते. या दोन्ही रिपोर्ट मध्ये बदल आल्याने पोलिसांचा संशय बळावला त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत त्यांनी ससून मधील दोघा डॉक्टरांना अटक केली.

या डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने घेतले आणि ते कचऱ्यात टाकले, त्यानंतर त्यांनी तिसऱ्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन आरोपीचे असल्याचे भासवत अहवाल दिला अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यानुसार हे दोन डॉक्टर काम करीत असल्याचा आरोप आमदार धंगेकर यांनी केला.

या आरोपामुळे राजकीय वर्तुळात हे प्रकरण चांगलेच तापले. या आरोपावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी जर धंगेकरांनी माझी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा मी त्यांच्यावर करेन, असा इशारा दिला आहे.

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की,” माझा फोन आणि त्या दोन डॉक्टरांचे फोन धंगेकर यांनी पोलिसांच्या ताब्यात द्यावेत आणि तपास करायला सांगावा. अशी खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागेल” असे मुश्रीफ यांनी सांगितले.