Sinhagad Fort Road Pune | सिंहगडावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता ‘या’ कालावधीत बंद, गडावर पायी जाण्यासाठी पर्यायी मार्ग कोणता? जाणून घ्या

0

पुणे : Sinhagad Fort Road Pune | पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने, त्याच्या दुरूस्तीसाठी सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (२३ मे पर्यंत) दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ही माहिती दिली आहे. पर्यायी मार्ग म्हणून गडावर पायी जाण्यासाठी अतकरवाडी मार्गे जाता येईल. (Pune News)

पावसाळ्यात निसर्ग सौंदय पाहण्यासाठी पुणेकर सिंहगडावर मोठ्या संख्येने जातात. परंतु, पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमुळे पर्यटक गडावर अडकून पडतात.

ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतात, त्या ठिकाणांची पाहणी वन विभागाने केली असून अशा ठिकाणचा धोकादायक दरडींचा भाग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सिंहगड किल्ल्यावर जाण्याच्या मार्गावर यापूर्वी दरडींचा धोका कमी करण्यासाठी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या आहेत. या जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वनविभाग करून घेत आहे. यासाठी सिंहगडावर जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.