Warje Malwadi Pune Crime News | पुणे : नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणीची फसवणूक

0

पुणे : – Warje Malwadi Pune Crime News | नोकरी लावण्याचे आमिषाने (Lure Of Job) एका तरुणीची फसवणूक (Cheating Fraud Case) करण्यात आल्याचा प्रकार वारजे माळवाडी येथील रामनगर (Ram Nagar Warje) येथे घडला आहे. आरोपीने सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 90 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार 8 मार्च ते 9 मे 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police Station) एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवणे येथे 27 येथील तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंद्रकांत धोंडीराम घाणेकर (Chandrakant Dhondiram Ghanekar) याच्यावर आयपीसी 406, 419, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाणेकर याने फिर्यादी तरुणीला नोकरीचे आमिष दाखवले.

घाणेकर याने फिर्यादी यांना एक देणार येईल असे सांगून एक पार्सल दिले. यामध्ये पैसे असून हे पार्सल नाशिक येथे पोहोचवण्यास सांगितले. तसेच पार्सलमध्ये पैसे असल्याने आसपासच्या लोकांना संशय येईल. त्यामुळे तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल जमा करा असे फिर्यादी यांना सांगितले.

यानंतर फिर्यादी पार्सल घेऊन नाशिक (Nashik) येथे गेल्या. मात्र, आरोपीने दिलेला पत्ता सापडला नसल्याने त्या परत आल्या. यानंतर फिर्य़ादी आरोपीच्या ऑफिसमध्ये गेल्या असता त्याला लॉक केल्याचे दिसून आले. त्यांनी घाणेकर याच्या मोबाईलवर फोन केला असता तो बंद लागला. फिर्य़ादी यांनी पार्सल उघडून पाहिले असता त्यामध्ये कोरे कागद आढळून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.