Loni Kalbhor Pune Crime News | पुणे : पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारासह साथीदारावर कोयत्याने हल्ला, 5 जणांवर FIR

0

पुणे : – Loni Kalbhor Pune Crime News | पुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून पाच जणांच्या टोळक्याने एका अट्टल गुन्हेगारासह त्याच्या साथीदारावर पालघन व लोखंडी कोयत्याने हल्ला केला (Attempt To Kill). ही घटना लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत बुधवारी(दि.15) रात्री घडली आहे. या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले असून पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

राज रविंद्र पवार (वय-25, रा. कवडीपाट गुजर वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) व सौरभ सुनिल गायकवाड अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर आकाश भाले (रा. गारुडी वस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे), सदाम अन्सारी (रा. इंदिरानगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि.पुणे), सागर कारंडे, किरण चव्हाण, ऑगी उर्फ यश जैन (तिघेही रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश भाले याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी राज पवार याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राज पवार व सौरभ गायकवाड हे दुचाकीवरुन त्यांचा मित्राला भेटण्यासाठी गारुडीवस्ती येथे आले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन संगनमत करत राज पवारच्या पोटावर पालघन मारुन जखमी केले. तसेच त्याचा साथीदार सौरभ याच्यावर लोखंडी कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघे जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेले.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन आरोपी आकाश भाले याला तात्काळ अटक केली. तर उर्वरीत चौघे पळून गेले असून त्यांच्या मागावर पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.