Thane Lok Sabha | ठाण्यात राजन विचारेंना पाठिंबा देऊ पण…, प्रकाश आंबेडकरांची शिवसेना ठाकरे गटाला ‘ही’ अट

0

मुंबई : Thane Lok Sabha | लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आता राज्यात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबई, ठाण्यात यासाठी राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे (Rajan Vichare) उभे आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एक अट घातली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि ठाकरे गटाचे (Shivsena UBT) राजन विचारे यांच्यात लढत होत आहे. येथे येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात वंचितने निवृत्त वैद्यकीय अधिकार डॉ. रामराव केंद्रे (Dr Ramrao Kendre) यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात बसप, बीआरएसपी, रिपब्लिकन बहुजनवादी, भीमसेना या आंबेडकरवादी पक्षासह अपक्ष असे २७ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित उमेदवाराने ४७, ४३२ मते घेतली होती. ही मते निर्णायक आहेत. आता वंचितच्या उमेदवारांचा अर्ज अवैध ठरल्याने वंचितचा पाठिंबा ज्या उमेदवाराला मिळेल, त्याची बाजू मजबूत होणार आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात ठाण्यातील ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र पाठवून पाठिंब्याची मागणी केली होती. याबाबत वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर (Rekha Thakur) यांनी म्हटले आहे की, आपल्याला पाठिंबा हवा असेल तर आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनंती करायला हवी, उमेदवारांच्या मागणीवर आम्ही पाठिंबा देत नाही. तसे आमचे धोरण आहे.

वंचित बहुजन आघाडी या लोकसभा निवडणुकीत राज्यात ४० जागा लढत आहेत. वंचितने ८ मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ठाकरे गटाच्या शिवसेनाचा यामध्ये एकाही उमेदवाराचा समावेश नाही.

ठाण्यात १९९६ पासून २००९ चा अपवाद वगळला तर येथे शिवसेनेचा खासदार जिंकून आला आहे. मात्र, मध्यंतरी शिवसेनेत फूट पडल्याने यावेळच्या निवडणुकीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.