Baramati Pune News | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

0

पुणे : Baramati Pune News | आमच मतदान लोकशाहीसाठी… प्रत्येकाच मत महत्वाच आहे. सर्वाचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे. मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि लोकशाहीने दिलेला हा आपला अधिकार आहे.

या ब्रीदवाक्यानुसार खास भारतीय लोकसभा निवडणुक २०२४ , यासाठी खास मतदान करण्यासाठी साहिल संजीव बोराटे रा. शिर्सुफळ, ता. बारामती, जिल्हा- पुणे. हा युनायटेड किंगडम (लंडन) येथे उच्च शिक्षण घेत आहे.तो युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपुल येथे मास्टर इन ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट हा मॅनेजमेंट अभ्यासक्रम करीत आहे. खास भारतीय संविधान आणि आपल स्वतःच राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी तो बारामतीत मतदानासाठी आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.