Pune Crime Branch | पुणे : मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची ‌झाडाझडती

0

पुणे : – Pune Crime Branch | पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha) सोमवारी (दि.13) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) देखील कंबर कसली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने गुंडांची झाडाझडत घेण्यास सुरुवात केली आहे. गंभीर गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या सराईत तसेच त्यांच्या साथीदारांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांत गोळीबाराच्या (Firing In Pune) घटना घडल्या आहेत. तसेच टोळक्याकडून वाहनांची तोडफोड (Vandalism Of Vehicles) करुन दहशत माजवल्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि.13) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांकडून मागिल तीन दिवसांपासून गुंडांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. दररोज मध्यारात्री पोलिसांकडून तपासणी मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन – Pune Police Combing Operation) राबवण्यात येत आहे. तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी (Pune Police Naka Bandi) करण्यात आली आहे. गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कोंढवा (Kondhwa), मुंढवा (Mudhwa), हडपसर (Hadapsar), बिबवेवाडी (Bibvewadi), मार्केट यार्ड (Market Yard), वानवडी (Wanwadi), लोणी काळभोर (Loni Kalbhor) परिसरातील सराईतांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलैश बलकवडे (Shailesh Balkawade IPS), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक आयुक्त सुनील तांबे (ACP Sunil Tambe), सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकांकडून दररोज रात्री शहराच्या वेगवेगळ्या भागातील सराइतांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. सराइतांची माहिती त्वरीत नजीकचे पोलीस ठाणे किंवा पोलीस नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील वेगवेगळ्या भागात सराइतांची तपासणी करण्यात येत आहे. गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ‌ठाण्यातील पथके सहभागी झाली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.