Maval Lok Sabha | मावळ लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी 12 मे रोजी साहित्याचे वितरण – निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

पुणे : Maval Lok Sabha | जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे (Pune Lok Sabha) आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता (Shirur Lok Sabha) सोमवार १३ मे रोजी मतदान होत आहे. मावळ लोकसभा निवडणूक मतदानाच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे १२ मे रोजी सकाळी ८ वाजता विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला (Deepak Singla) यांनी दिली आहे.
पनवेल विधानसभा मतदासंघाकरीता (Panvel Vidhan Sabha) ए. आर. कासेकर पॉलिटेक्नीक कॉलेज (A.R. Kalsekar Polytechnic), ठाणा नाका रस्त्याजवळ, कर्नाळा स्पोर्टस् ॲकेडेमीच्या समोर, पनवेल जि. रायगड, कर्जत विधानसभा मतदारसंघाकरीता (Karjat Vidhan Sabha) पोलीस मैदान, प्रशासकीय इमारतीजवळ, कर्जत, उरण विधानसभा मतदारसंघाकरीता (Uran Vidhan Sabha) डी.बी. पाटील मंगल कार्यालय (DB Patil Mangal Karyalay), जसई, ता. उरण, जि. रायगड, मावळ विधानसभा मतदारसंघाकरीता (Maval Vidhan Sabha) नूतन अभियांत्रिकी कॉलेज (Nutan College of Engineering and Research), तळेगाव दाभाडे, ता. मावळ, चिंचवड विधानसभा मतदारसंघाकरीता (Chinchwad Vidhan Sabha) पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ, स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन, थेरगाव आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाकरीता (Pimpri Vidhan Sabha) ऑटो क्लस्टर आणि रिसर्च सेंटर, चिंचवड येथून साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहितीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला यांनी दिली आहे.