Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

0

गुन्ह्यात पकडून दिल्याच्या रागातून खून करून मृतदेह खड्डा करून पुरला


पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Lonikand Crime | लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) चोरीच्या गुन्ह्यात त्याला तीन वर्षांपूर्वी पकडले होते. या गुन्ह्यात पकडून दिल्याच्या रागातून त्याने आपल्या भावाच्या मदतीने त्याच्याच पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह चांदवड गावाच्या डोंगरात खड्डा करुन पुरला व पुरावा नष्ट केला होता (Murder Case). प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर घरी येऊन मटणाची पार्टी केली. हा गुन्हा केल्यापासून फरार झालेल्या दीराला लोणीकंद पोलिसांच्या पथकानेच पुन्हा अटक केली आहे.

गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१, रा. शिरगाव परंदवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे ५ गुन्हे दाखल आहेत. लोणीकंद पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी एका गुन्ह्यात गणेश चव्हाण याला पकडले होते. यावेळी सुनंदा लक्ष्मण चव्हाण (वय २७, रा. पाचाणे, ता. मावळ) हिने पकडून देण्यास मदत केली होती. त्याच्या रागातून गणेश चव्हाण याने आपला भाऊ व पत्नीच्या मदतीने १६ जानेवारी रोजी सुनंदा हिचा डोक्यात दगड घालून खून केला होता. त्यानंतर त्यांनी चांदखेड येथील डोंगरावर जमिनीत नेऊन पुरला होता.

दरम्यान, सुनंदा हिचा फोन बंद लागत असल्याने व ती घरातही नसल्याने तिचा भाऊ शाम नामदेव चव्हाण (वय २८, रा. केळवडे, ता. भोर) यांनी शिरगाव -परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खूनाचा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी पती लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय ३२) आणि जाऊ नंदा गणेश चव्हाण या दोघांना अटक केली होती. त्यावेळी गणेश चव्हाण हा पळून गेला होता.

पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात गणेश चव्हाण हा खूनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अधून मधून लोणी परिसरात येत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजित फरांदे यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे (Sr PI Vishwajit Kaingade) यांना याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र गोडसे, अमंलदार किरण पड्याळ, अजित फरांदे, प्रतिक्षा पानसरे यांनी गणेश चव्हाणला लोणीकंद येथील जिल्हा परिषद शाळेपासून ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी परंदवाडी पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले आहे.

त्याच्याविरुद्ध यापूर्वी चाकण, लोणीकंद, अहमदनगर पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का कारवाईही झाली आहे.
Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार
Murder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेत वस्ताऱ्याने गळ्यावर वार करुन खून : फरासखाना पोलिसांकडून आरोपीला अटक

Leave A Reply

Your email address will not be published.