Pune Police MCOCA Action | फटाके फोडण्यावरुन तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या फहीम खान टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

IPS Ritesh Kumar

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | मार्केट यार्ड परिसरात फटाके फोडण्यावरुन एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) करणाऱ्या फहीम खान व त्याच्या इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 98 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

याबाबत कुमार राम कांबळे (वय-20 रा. आंबेडकर नगर, मार्केटयार्ड) याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Marketyard Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार फहीम फिरोज खान (वय-21), शाहरुख सलीम खान (वय-21 सर्व रा. आंबेडकर नगर) यांच्यावर आयपीसी 307, 323, 504, 34 सह आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली असून आरोपी सध्या येरवडा कारागृहात (Yerawada Jail) आहेत. तर त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. हा प्रकार 12 नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास मार्केटयार्ड येथील गल्ली नंबर 11 येथे घडला होता.

मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम
3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा (Pune Police MCOCA Action) प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त
पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास वानवडी विभागाचे (Wanwadi Division) सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे (ACP Shahuraje Salve) करीत आहेत.

ही कामगिरी ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) अपर पोलीस आयुक्त
गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा (DCP R Raja), सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या
मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड (Sr. PI Suresh Singh Goud), पोलीस निरीक्षक गुन्हे
स्वप्नाली शिंदे (PI Swapnali Shinde), सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव (API Kailas Daberao),
पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले (PSI Chetan Bhosale), सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर,
चव्हाण यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा