Pune PMP News | पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

Pune PMP

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune PMP News | दिवाळी बोनस मिळाल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (Pune Mahanagar Transport Corporation) सर्व कायम, बदली कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड झाली आहे. पीएमपीच्या (Pune PMP News) एकुण ९ हजार ४५१ सेवकांना बोनस देण्यात आला आहे. सानुग्रह अनुदान ८.३३ टक्के आणि बक्षिस २१ हजार दिवाळीपूर्वी मिळावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती ती पूर्ण झाली आहे.

पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि पिंपरी महापालिका (Pimpri Municipal Corporation) संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी (Pune PMP News) कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपीने याबाबतचे प्रस्ताव दोन्ही महापालिकांना दिले होते. यानंतर पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यात लक्ष घालत प्रशासनाला बोनस देण्याचे आदेश दिले.

तसेच पीएमटी कामगार इंटक संघटनेने सुद्धा मागणीचा पाठपुरावा केला होता. कामगार संघटनेने पालकमंत्री अजित पवार,
राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर (Deepak Mankar), शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा