Multibagger Stock | 33 रुपयांचा ‘हा’ शेयर रू. 113.65 वर पोहचला, केवळ 21 दिवसात गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 3.39 लाख, तुमच्याकडे आहे का?

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Multibagger Stock | अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार 848 अंकांपेक्षा जास्त वाढला होता. या काळात बहुतांश शेयरमध्ये तेजी दिसून आली होती. अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेवूयात ज्याने केवळ 21 व्यवहाराच्या सत्रांमध्ये मोठा रिटर्न देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केले. (Multibagger Stock)

गेल्या एक महिन्यापासून या स्टॉकमध्ये कमालीची वाढ झाली आहे आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी तो 4.99 टक्क्यांनी वाढला होता. हा टेक्सटाईल स्टॉक ए. के. स्पिनटेक्स (AK Spintex) चा आहे.

21 दिवसांत 239.25% रिटर्न
या मल्टीबॅगर स्टॉकची 3 जानेवारी 2022 रोजी किंमत 33.50 रुपये होती. 1 फेब्रुवारी 2022 रोजी त्याची शेवटची किंमत 113.65 रुपये होती.
म्हणजेच, त्याने केवळ 23 व्यवहाराच्या सत्रांमध्ये आपल्या शेयरधारकांना 239.25 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे.

त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, AK Spintex स्टॉकची किंमत 22 रुपयांवरून (2 ऑगस्ट 2021 बंद किंमत) 113.65 रुपये (1 फेब्रुवारी 2022 बंद किंमत) पर्यंत वाढली आहे.
या कालावधीत या शेयरने आपल्या शेयरधारकांना 416.59 टक्के रिटर्न दिला आहे. (Multibagger Stock)

गुंतवणूकदारांसाठी मोठा नफा
जर एखाद्या गुंतवणूकदाराने नवीन वर्ष 2022 च्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे 3 जानेवारी रोजी या टेक्साटाईल शेयरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 3.39 लाख रुपये झाली असती.

त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कापड स्टॉकमध्ये 6 महिन्यांपूर्वी 22 रुपयांच्या पातळीवर 1 लाख गुंतवले असते, तर आजची रक्कम 5.16 लाख रुपये झाली असती.
गेल्या काही दिवसांत, या मल्टीबॅगर स्टॉकने सर्व व्यवहाराच्या सत्रांमध्ये 5 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली आहे.
हा या वर्षासाठी संभाव्य मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय ?
ही कंपनी मूळत: AK Processors Pvt Ltd या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून सुरू केली होती.
तिची सुरुवात 6 ऑक्टोबर 1994 रोजी झाली होती.

मानवनिर्मित कापडांवर प्रक्रिया करण्याच्या उद्देशाने कंपनीची सुरुवात करण्यात आली.
व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी 6 जानेवारी 1995 रोजी कंपनीचे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून रूपांतर करण्यात आले.

ऐंशीच्या दशकात वस्त्रोद्योग क्षेत्रात भरपूर संधी होत्या.
वस्त्रोद्योग विकासावर सरकारने भर दिला.
या संधीचा फायदा घेण्यासाठी कंपनीने कापड प्रक्रिया व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title :- Multibagger Stock | multibagger stock given 239 percent return in 23 trading season 1 lakh turn to 3 39 lakh rupees check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Loan Guarantor | विचारपूर्वक राहा Loan गॅरंटर ! लोन डिफॉल्ट झाल्यास भरावे लागतात पूर्ण पैसे, जाणून घ्या सविस्तर

नवी सुविधा ! केवळ 1 मोबाईल नंबरवरून संपूर्ण कुटूंबाला मिळेल Aadhaar PVC card, पहा सोप्या स्टेप्स

Pune NCP | बंडातात्या कराडकर यांच्या विधानाचा पुणे राष्ट्रवादीकडून ‘जोडे मारो’ आंदोलन करुन निषेध

Leave A Reply

Your email address will not be published.