Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल
एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) हा असा आजार आहे ज्यामध्ये खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही तर समस्या वाढू शकते. खराब जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि तणाव ही या आजाराची कारणे आहेत. साखरेचे रुग्ण अनेकदा थकवा आणि अशक्तपणाची तक्रार करतात, अशा स्थितीत आहाराकडे लक्ष न दिल्यास त्रास वाढू लागतो. (Diabetes)
एका हेल्थकेअर कंपनीने प्रकाशित केलेल्या ’इंडिया फिट रिपोर्ट 2019’ नावाच्या अभ्यासानुसार, 2017 ते 2018 या कालावधीत 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये मधुमेहाच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ झाली आहे.
मधुमेहाचे रुग्ण साखर नियंत्रणात (Gugar Control) ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवतात, तसेच साखर कमी करण्यासाठी औषधे घेतात, तेव्हा त्यांची साखर नियंत्रणात येते. पण तुम्हाला माहित आहे का, आयुर्वेदिक औषधी वनस्पती साखर नियंत्रित करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आयुर्वेदिक औषधी वनस्पती अश्वगंधा (Ashwagandha) साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे. (Diabetes)
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली अश्वगंधा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. यामध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात, ज्यामुळे ती केवळ ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठीच नाही तर इतर अनेक आजारांवरही आराम देते.
आयुर्वेदानुसार अश्वगंधाचे महत्त्व (Importance of Ashwagandha according to Ayurveda) :
अश्वगंधा वनस्पतीच्या मुळामध्ये औषधी गुणधर्म असून त्याचा मज्जासंस्थेवर चांगला परिणाम होतो असे म्हटले जाते. यामुळेच नैराश्य, चिंता, थकवा, तणाव, निद्रानाश आणि मज्जातंतूंचा थकवा यावर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.
मधुमेही रुग्णांसाठी अश्वगंधा गुणकारी (Ashwagandha effective for diabetic patients) :
अश्वगंधा इन्सुलिन स्राव वाढवण्यास मदत करते आणि स्नायूंच्या पेशींमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, त्यामुळे मधुमेहींसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
अश्वगंधा सेवन केल्यानेही कोरोनाला प्रतिबंध करता येतो. अश्वगंधाचा काढा करूनही तुम्ही घेऊ शकता.
अश्वगंधाच्या नियमित आणि मर्यादित सेवनाने शरीराला खूप फायदा होतो.
महिलांसाठी कशाप्रकारे फायदेशीर आहे अश्वगंधा (How Ashwagandha is beneficial for women) :
अश्वगंधा इम्युनिटी मजबूत करते, तसेच तणाव देणार्या हार्मोन्सला सुद्धा सामान्य करते.
याच्या सेवनाने महिलांमधील वंध्यत्व दूर होते. अॅनिमियाचा त्रास असलेल्या महिलांसाठी अश्वगंधाचे सेवन खूप फायदेशीर आहे.
Web Title :- Diabetes | control diabetes with ayurvedic herbs ashwagandha know its best benefits
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव
Cause Of Dark Lips | ‘या’ 5 वाईट सवयीमुळे तुमचे ओठ होतील काळे, जाणून घ्या सवयी
आहेत तरी कोणत्या?
Long Covid Symptoms | रिकव्हरीनंतर सुद्धा त्रस्त करतात ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणे