Gold Price Today | सोन्याच्या दरात मोठी घसरण, स्वस्तात खरेदीची सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सतत वाढ होत असताना आज सोने दरात (Gold Price Today) घसरण झाली आहे. जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी आहे. आज (गुरुवार) मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange) सोने दरात (Gold Price Today ) 1.12 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. याशिवाय चांदीच्या दरात (Silver Price Today) देखील घसरण झाली आहे.

MCX वर ऑगस्ट 2020 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Price Today) जवळपास 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. आज MCX वर सोने दर 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. म्हणजेच गोल्ड आपल्या सर्वोच्च स्तरावरुन 7900 रुपये स्वस्त मिळत आहे.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 1.12 टक्क्यांच्या घसरणीसह 48,305 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर चांदीचा भाव 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह 63,282 रुपये प्रति किलो इतका आहे.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर
सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात. 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल. या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल. (Gold Price Today)

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी
24 कॅरेट सोने (24 Carat Gold) सर्वात शुद्ध परंतु पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने (Jewelry) तयार करणे शक्य नाही.
सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो.
ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते.
जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेणार असाल तर तुम्हाला हे माहित पाहिजे की, 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेसाठी 5 प्रकारचे हॉलमार्क असून ते दागिन्यांवर असतात.

Web Title :-  Gold Price Today | gold and silver price fall on today 27 january 2022 check 10 gram latest rate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

Home Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4 गोष्टी; जाणून घ्या

Omicron | तुम्ही ओमिक्रॉनने संक्रमित आहात किंवा नाही? शरीरात सर्वप्रथम दिसते ‘हे’ एक लक्षण; जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.