Fenugreek Seeds Benefits | मधुमेह आणि अ‍ॅसिडिटीपासून वजन कमी करण्यासाठी मेथी एक प्रभावी उपाय, जाणून घ्या कसे करावे सेवन

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fenugreek Seeds Benefits | विज्ञान किती जरी पुढे गेले असले तरी त्याला आजीच्या घरगुती उपायांची तोड नाही. बऱ्याच वेळेस घरात सहज सापडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या खूप कामी येतात. आणि याच छोट्या गोष्टी मोठ्या आजारावर रामबाण उपाय ठरतात. अनियमित जीवनशैलीमुळे पोटदुखी (Abdominal Pain), अ‍ॅसिडिटी (Acidity), शुगर (Sugar) यासारख्या समस्या होत असतात. असे आजार उद्भवल्यास आपण डॉक्टरकडे धाव घेतो. पण या घरगुती उपायाचा वापर केला तर तुम्हाला सतत डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. आपल्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरल्या जाणाऱ्या मेथी दाण्यामध्ये असणाऱ्या या गुणधर्माची माहिती खूप कमी लोकांना असते (Fenugreek Seeds Benefits).

मेथीचे दाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. सकाळी मेथीचे दाणे खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते. चला जाणून घेऊयात मेथी दाणे कसे आपल्या शरीरासाठी गुणकारी आहेत –

चला जाणून घेऊया मेथी दाण्याचे फायदे:
1. वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्या. मेथीचे दाणे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारात उत्कृष्ट भर घालू शकतात. (Fenugreek Seeds for weight loss) मेथी दाणे फायबरने भरपुर असतात ज्यामुळे शरीरातील साखर हळूहळू कमी होऊ लागते.

2. अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर मेथी दाणे अतिशय प्रभावी उपाय आहेत. हजमा चुरणमध्येही मेथीचा वापर केला जातो. जर तुम्हाला कधी अ‍ॅसिडिटीची समस्या असेल तर मेथीचे सेवन करणे फायदेशीर ठरते. (Fenugreek Seeds Benefits)

 

 

3. आज बऱ्याच लोकांना मधुमेहाची समस्या आहे. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे खूप महत्त्वाचे असते. अशा रुग्णांनी रोज मेथीचे सेवन करावे. असे केल्याने त्यांची साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

4. मेथी दाणे केसांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेऊ शकतात . मेथी केसांना मजबूत बनवते ज्यामुळे केस गळती कमी होऊ लागते. (Fenugreek for hair care).

 

केसांना मेथीचे पोषण कसे पुरवाल – मेथी दाणे पाण्यात भिजवून ठेवा आणि नंतर बारीक पेस्ट करून केसांना लावा. मेथी दाणे केसांना सुंदर, दाट आणि मुलायम बनवतात.

5. कोलेस्ट्रॉलची समस्या दूर करण्यात मेथी दाणे फायदेशीर – कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या लोकांनी आवर्जून मेथी दाण्याचे सेवन करावे. मेथीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉल, LDL (खराब कोलेस्टेरॉल) आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी होण्यास मदत होते आणि फायदेशीर HDL कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. कारण या दाण्यांमध्ये स्टिरॉइडल सॅपोनिन्स असतात जे आतड्यांचे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करतात. (Cholesterol control)

कसे करावे मेथी दाण्याचे सेवन :-

 


एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा आणि मेथीचे दाणे चांगले चावून खा .

Web Title :- Fenugreek Seeds Benefits | fenugreek seeds benefits for weight loss acidity diabetes cholesterol problem methi dana home remedies

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Good Sleep Tips | रात्री हवी असेल शांत झोप, तर रात्रीच्या जेवणात खाऊ नका ‘हे’ 5 पदार्थ; जाणून घ्या

Long Covid Signs | लाँग कोविडची अशी 5 लक्षणे ज्यांच्याकडे नेहमी केले जाते दुर्लक्ष ! जाणून घ्या

Moola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे! जाणून घ्या कोणते

Leave A Reply

Your email address will not be published.