Moola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे! जाणून घ्या कोणते

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Moola In Winters | हिवाळा सुरू झाला की, प्रत्येकाला मुळ्याचे पराठे, सॅलड, लोणचे आणि खुप काही खावेसे वाटते. मुळा हिवाळ्यातच येतो आणि या काळात तुम्ही तो जरूर खावा. कारण चवीसह त्याचे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. (Moola In Winters)

हिवाळ्यात लोक मुळा-गाजर खूप खातात, जर तुम्हालाही ते आवडत असेल तर त्याचे आरोग्याशी संबंधित फायदे नक्कीच जाणून घ्या. मुळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात.

1. पचन सुधारते (Improves Digestion)
मुळा फायबर समृद्ध आहे, जे पचन संबंधित समस्या दूर करते. जर तुम्ही दररोज मुळ्याची कोशिंबीर पुरेशा प्रमाणात खाल्ली तर तुमची आतड्याची हालचाल सुरळीत होईल. तसेच तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या होणार नाही. मुळा तुमचे पोट निरोगी ठेवू शकतो. (Moola In Winters)

2. सर्दीशी लढा (Fight the cold)
सर्दीची समस्या हिवाळ्यात जास्त प्रमाणात होते. अशावेळी, मुळा उपयोगी पडतो. मुळ्यामध्ये कंजेस्टिव्ह गुणधर्म असतात, जे घशातील कफ साफ करण्याचे काम करतात. (Mooli In Winters)

3. इम्युनिटी वाढवतो (Boosts Immunity)
जीवनसत्त्वे ए, सी, ई, बी 6, पोटॅशियम आणि इतर खनिजांनी समृद्ध असलेला मुळा तुमच्या शरीराची इम्युनिटी वाढवू शकतो. मुळा अँटिऑक्सिडंट्स आणि अँथोसायनिन्सने सुद्धा समृद्ध आहे, याचा अर्थ तो तुमच्या हृदयासाठी चांगला ठरू शकतो. दीर्घकालीन फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला या भाजीचे नियमित सेवन करावे लागेल.

4. रक्तदाब नियंत्रित ठेवतो (Controls Blood Pressure)
पोटॅशियमने समृद्ध असलेला मुळा शरीरात सोडियम-पोटॅशियमचे संतुलन राखून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. हायपरटेन्सिव्ह गुणधर्मामुळे
हिवाळ्यात पुरेसा मुळा खावा. उच्च रक्तदाबाच्या समस्येची जर
काळजी घेतली नाही तर ती आणखी वाढू शकते.

5. त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial For Skin)
इतर जीवनसत्त्वांशिवाय मुळ्यामध्ये फॉस्फरस आणि जस्त देखील असते.
कोरडेपणा, पुरळ यापासून मुक्त होण्यास मदत होते. मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाणही चांगले असते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते.
जर तुम्ही रोज मुळा खाल्ल्यास हिवाळ्यात तुमची त्वचा चमकदार होईल.

Web Title :- Moola In Winters | moola in winters 5 health benefits of radishes that you may not know Mooli in Winters

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Carrot Health Benefits | थंडीच्या हंगामात ‘या’ वेळी करा सुपर फूड गाजरचे सेवन, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे; जाणून घ्या

Coronavirus Omicron Infection | एखाद्या संक्रमित व्यक्तीला न भेटताही असे होऊ शकता कोविड पॉझिटिव्ह, जाणून घ्या कारणे

Maharashtra Cold Weather | राज्यात पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी

Leave A Reply

Your email address will not be published.