Side Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त, बसण्याच्या वेळेनुसार व्यायाम आवश्यक – संशोधन

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Side Effects of Long Sitting | एकाच जागी जास्त वेळ बसल्याने (Long Sitting) आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होते. मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), कर्करोग (Cancer) यांसारख्या अनेक आजारांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसणे कारणीभूत आहे. परंतु दिर्घकाळ बसण्याने होणारी हानी टाळायची असेल, तर बसण्याच्या प्रत्येक एका तासानंतर 3 मिनिटे मध्यम जलद गतीने व्यायाम केला तर हे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. शिवाय, यामुळे व्यक्तीचा अकाली मृत्यूचा धोका सुद्धा 30% कमी केला जाऊ शकतो. (Side Effects of Long Sitting)

ग्लासगो कॅलेडोनियन विद्यापीठातील (Glasgow Caledonian University) संशोधकांनी केलेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, एखाद्या व्यक्तीने कामानंतर दिवसातील उर्वरित वेळात (म्हणजे 7 ते 8 तास झोपण्यासाठी काढल्यानंतर) सक्रिय राहिले पाहिजे.

तुमचे काम जास्त वेळ बसण्याचे असेल तर त्यानुसार व्यायामासाठी वेळ द्यावा. म्हणजेच एका तासाच्या बसण्याच्या कामासाठी 3 मिनिटांचा व्यायाम करावा.

जर तुमची 4 ते 6 तासांची कामाची बैठक असेल तर तुम्हाला 12 ते 18 मिनिटे व्यायाम करावा लागेल. त्याचप्रमाणे 6 ते 8 तास बसल्यानंतर तुम्हाला 18-24 मिनिटे व्यायाम करावा लागेल. आणि जर 8-10 तासांपर्यंत कामाची बैठक असेल, तर व्यायामासाठी 24-30 मिनिटे द्यावी लागतील. (Side Effects of Long Sitting)

हे 3 फार्म्युले आहेत उपयोगी
ग्लासगो कॅलेडोनियन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ हेल्थ अँड लाईफ सायन्सेस (School of Health and Life Sciences)
चे प्राध्यापक सेबॅस्टियन चेस्टिन (Professor Sebastien Chastin) यांच्या मते, बसण्याच्या वेळेवर आधारित आणखी तीन फार्म्युले आहेत.

1. जर दिवसभर बसणे 11 तासांचे असेल, तर 55 मिनिटे व्यायाम आणि 4 तास पूर्णपणे सक्रिय राहूनही शरीराला होणारे नुकसान भरून काढता येते.

2. त्याचप्रमाणे, 10.5 तास बसत असाल तर, 13 मिनिटे जलद व्यायाम आणि 5.5 तास शारीरिक हालचाली आवश्यक आहेत.

3. साडेनऊ तास बसण्यासाठी केवळ 3 मिनिटे व्यायाम करणे आणि 6 तास शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे सक्रिय असणे आवश्यक आहे.

Web Title :- Side Effects of Long Sitting | long sitting increases the risk of premature death exercise necessary according to sitting time study

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dark Circle Instant Removal Trick | आता 1 मिनटात डार्क सर्कल्स करा गायब, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

PM Kisan | तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नसतील तर ही कामे नक्की करून घ्या

Ration Card | रेशन कार्ड नसेल तरी देखील मिळणार मोफत अन्नधान्य; जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.