Health Benefits of Clove | पचनक्रिया, लठ्ठपणा आणि दातदुखीमध्ये खुपच फायदेशीर ठरते लवंग, जाणून घ्या

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Health Benefits of Clove | लवंग भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. प्राचीन काळापासून भारतात लवंगचा उपयोग मसाल्यांमध्ये सोबतच आरोग्य क्षेत्रामध्ये भरपूर केला गेला आहे. आयुर्वेदातही लवंग औषधासाठी वापरली जाते. लवंगाचे वैज्ञानिक नाव सिझिजियम अरोमेटिकम आहे. लवंगमध्‍ये अ‍ॅण्टी-ऑक्सिडंट (Anti – oxidant), अँटी-मायक्रोबियल (Anti – microbial) अँटी-वायरल (Anti -viral) आणि वेदनाशामक व्हिटॅमिन (Analgesic vitamins), खनिजे (manganese, potassium) आणि इतर पौष्टिक घटक आढळतात जे शरीराला अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करतात (Benefits of cloves). चला जाणून घेऊयात लवंग खाण्याचे फायदे (Health Benefits of Clove) –

• पचनास उपयुक्त (Clove is Suitable for digestion)
पोट फुगणे, गॅस, अपचन, मळमळ, जुलाब आणि उलट्या या पचनाच्या समस्यांमध्ये लवंग फायदेशीर मानली जाते. लवंगामध्ये आढळणारे गुणधर्म पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. सकाळी लवंग खाल्ल्याने पचनाच्या कोणत्याही समस्यांवर उपचार करण्यास मदत होते. लवंग पाचक एन्झाईम्सचा स्राव वाढवते ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन (Cloves for constipation and indigestion) यांसारख्या पाचक विकारांचा प्रतिबंध होतो. लवंग फायबरने भरलेले असते जे तुमच्या पाचक आरोग्यासाठी चांगले असते.

• संधिवातवर उत्तम उपाय
लवंग त्यांच्या दाहक-विरोधी प्रभावांसाठी ओळखल्या जातात. काही अभ्यासात असे दिसून आले आहे की दररोज लवंग खाल्ल्याने मोठे मोठे फायदे होऊ शकतात आणि तज्ञ संधिवातपासून मुक्ती मिळवण्यात मदत करण्यासाठी त्यांची शिफारस करतात. लवंगाचे तेल लोशन म्हणून वापरा. संधिवात आणि सांध्यामध्ये होणारी वेदना आणि सूज कमी करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरू शकते. लवंगात फ्लेव्होनॉइड्स आढळतात, लवंगाच्या तेलाची मालिश केल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. (Clove for arthritis)

• दातदुखीवर उपयुक्त
लवंगात वेदनाशामक गुणधर्म असल्यामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. लवंग तुमच्या वरच्या आणि खालच्या दातांमध्ये धरा.
किंवा लवंगाची पेस्ट बनवा आणि त्यात काही थेंब ऑलिव्ह ऑईल टाका. ही पेस्ट थेट दाताला लावा.
जर तुमच्याकडे लवंग तेल असेल तर ही सर्वात सोपी पद्धत आहे.
दातदुखी आणि हिरड्यांची जळजळ कमी (Cloves for toothache) करण्यासाठी लवंग अत्यंत गुणकारी आहे. (Health Benefits of Clove)

• लठ्ठपणामध्ये उपयुक्त (Clove is Useful in obesity)
लवंगात लठ्ठपणा विरोधी प्रभाव असतो ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर तुम्ही लवंगाच्या पाण्याचे सेवन करू शकता.
सकाळी एक ग्लास पाणी 2-3 लवंग टाकून उकळून घ्या थोडा थंड झाल्यावर त्याचे सेवन करा.
या उपायाचा वापर करून तुम्ही तुमचा वजन नक्कीच कमी करू शकता.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :-  Health Benefits of Clove | health benefits of clove amazing benefits of eating or use of clove for digestion obesity and toothache

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Side Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त, बसण्याच्या वेळेनुसार व्यायाम आवश्यक – संशोधन

Dark Circle Instant Removal Trick | आता 1 मिनटात डार्क सर्कल्स करा गायब, जाणून घ्या ‘हे’ घरगुती उपाय

PM Kisan | तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे अजूनही मिळालेले नसतील तर ही कामे नक्की करून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.