Vitamin Deficiency Signs and Symptoms | सावधान ! ‘व्हिटॅमिन -ए’च्या कमतरेमुळे होऊ शकतात गंभीर आजार, दुर्लक्ष करू नका हे लक्षण

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Vitamin Deficiency Signs and Symptoms | आपल्या शरीराला रोज निरोगी राहण्यासाठी अनेक घटक गरजेचे आहेत. यामध्ये व्हिटॅमिनचा मोलाचा वाटा आहे. अनेक प्रकारचे व्हिटॅमिन शरीरात कार्य करतात. आणि त्यापैकी व्हिटॅमिन-ए हे एक महत्वाचे व्हिटॅमिन आहे. याला रेतीनोल सुद्धा म्हणतात. व्हिटॅमिन-ए शक्तिशाली अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) आहे,

जे मुक्त रॅडिकल्सच्या (Free radicals) हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करण्यास मदत करते. याशिवाय, शरीराच्या योग्य विकासात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच नवजात आणि लहान मुलांसाठी व्हिटॅमिन-ए खूप महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारच्या संसर्गाशी लढण्यास व्हिटॅमिन-ए मदत करते. शरीरात व्हिटॅमिन- एची कमतरता (Vitamin-A deficiency symptoms) असल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. (Vitamin Deficiency Signs and Symptoms)

जाणून घेऊयात काय आहेत व्हिटॅमिन-ए कमतरतेची लक्षणे :

थकवा जाणवणे

फाटलेले ओठ

अतिसार

मूत्राशय संसर्ग

दुखापत बरी न होणे

मुलाच्या शारीरिक विकासाचा अभाव

दृष्टी कमी होणे

वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गाचे संक्रमण

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणाऱ्या समस्या आणि रोग (Vitamin -A deficiency symptoms)

अंधत्व / रात आंधळेपणा

अशक्तपणा

मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग

प्रतिकारशक्ती कमकुवत होणे

श्वसनमार्गाचे संक्रमण

घसा आणि छातीत संक्रमण

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेचा धोका जास्त आहे या लोकांना (Vitamin Deficiency Signs and Symptoms)

यकृतचा आजार असलेल्या लोकांमधे व्हिटॅमिन- ए ची कमतरता भासू शकते.

टीबी, कॅन्सर, न्यूमोनिया, किडनी इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन यापैकी कोणता आजार असल्यास ‘अ ‘ जीवनसत्वाची कमतरता होऊ शकते.

गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांमध्ये व्हिटॅमिन एच्या कमतरतेचा धोका असतो.

अ जीवनसत्वाची कमतरता टाळण्यासाठी

व्हिटॅमिन-ए युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. जसे की आंबा, कलिंगड, गाजर, बीट, रताळे, टोमॅटो, ब्रोकोली, मटार इत्यादी हे.

गरोदर आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी विशेष काळजी घ्यावी ज्यानेकरून त्यांच्या शरीरात ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता भासणार नाही.

डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळोवेळी मुलांना ‘अ’ जीवनसत्त्वाचे पूरक आहार द्या.

Web Title :- Vitamin Deficiency Signs and Symptoms | signs and symptoms of vitamin a deficiency diseases in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Disadvantages Of Sleeping Empty Stomach | सावधान ! उपाशी पोटी झोपणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक, होते ‘हे’ नुकसान; जाणून घ्या

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

Leave A Reply

Your email address will not be published.