SBI Tax Saving Scheme | 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 6.53 लाख; सोबतच टॅक्स सवलतीचा फायदा

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Tax Saving Scheme | तुम्ही निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा पर्याय शोधत असाल, तर तुम्ही SBI च्या Tax Saver FD योजनेत गुंतवणूक करू शकता. यामध्ये केलेल्या 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80 C अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. (SBI Tax Saving Scheme)

यामुळे पगारदार कर्मचार्‍यांसाठी हा सुरक्षित पर्याय मानला जात आहे. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मॅच्युरिटीवर रिटर्न करपात्र आहे. एसबीआयच्या एफडी स्कीममध्ये, किमान रु. 1,000 ने खाते उघडता येते. कमाल ठेवीवर मर्यादा नाही.

एसबीआय एफडी 5 लाख ठेवीवर 1.53 लाख व्याज
एसबीआयच्या एफडी योजनेंतर्गत, सध्या नियमित ग्राहकांना 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के वार्षिक व्याज दिला जातो. जर तुम्ही 5 लाख रुपयांची एफडी केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,53,800 रुपये मिळतील.

यामध्ये तुम्हाला व्याजातून 1,53,800 रुपये उत्पन्न मिळेल. एसबीआय मुदत ठेवींवरील व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ होते.

तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास, एफडी व्याजदर वार्षिक 6.20 टक्के असेल. अशा स्थितीत, जर तुम्ही 5 लाख रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,80,093 रुपये मिळतील.
यामध्ये व्याजाद्वारे 1,80,093 रुपये उत्पन्न मिळेल.

एसबीआय त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 वर्षे किंवा त्याहून अधिक
कालावधीच्या एफडी साठी एसबीआय Wecare ठेव योजना चालवत आहे.
यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळणार्‍या 0.50 टक्के अतिरिक्त व्याज व्यतिरिक्त 0.30 टक्के अधिक व्याज उपलब्ध आहे. (SBI Tax Saving Scheme)

म्हणजेच, जर तुम्ही 5 वर्षांसाठी एफडी केली असेल तर तुम्हाला 6.2% वार्षिक व्याज मिळेल. हे जाणून घ्या की SBI WeCare ठेव योजनेचा लाभ केवळ 31 मार्च 2022 पर्यंतच मिळू शकतो.

टॅक्स सेव्हिंग एफडीचे फायदे
सहसा, पगारदार करदाते शेवटच्या क्षणी कर बचतीसाठी बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात.
वास्तविक, बँकेची मुदत ठेव सुरक्षित मानली जाते.
जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

टॅक्स सेव्हिंग एफडींना कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो.
मात्र एफडी मधून मिळणारे व्याज करपात्र आहे.
यामध्ये एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वाचवता येतो.

त्याला 5 वर्षांचा लॉक इन कालावधी आहे.
हा कालावधी 10 वर्षांपर्यंत वाढू शकतो.
प्राप्तीकर नियमांनुसार, ठेवीदार फॉर्म 15G/15H सबमिट करून कर सवलतीचा दावा करू शकतो.

Web Title :- SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

IPS Transfer Maharashtra | डॉ. भूषणकुमार उपाध्याय गृह रक्षक दलाचे नवे महासंचालक तर कुलवंत कुमार यांची ‘वाहतूक’च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या खात्यात किती असावा मिनिमम बॅलन्स? अन्यथा लागू शकते पेनल्टी; जाणून घ्या

Leave A Reply

Your email address will not be published.