Responsibilities Of WhatsApp Group Admin | जर तुम्ही सुद्धा असाल एखाद्या WhatsApp ग्रुपचे अ‍ॅडमिन तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Responsibilities Of WhatsApp Group Admin | तुम्ही एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन (admin of WhatsApp group) असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ग्रुप अ‍ॅडमिन्सना बाकीच्या यूजरपेक्षा जास्त अधिकार मिळतात आणि त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी असते. (Responsibilities Of WhatsApp Group Admin)

अशा परिस्थितीत कोणत्याही ग्रुपमध्ये बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची जबाबदारी ग्रुप अ‍ॅडमिनची असते. ग्रुपमध्ये कोणत्या प्रकारचा कंटेंट शेअर केला जात आहे हे ग्रुप अ‍ॅडमिनला कळायला हवे, अन्यथा ग्रुप अ‍ॅडमिनला तुरुंगात जावे लागू शकते.

1. कधीही देशविरोधी कंटेंट शेअर करू देऊ नका (Never allow anti-national content to be shared)
अ‍ॅडमिनने कधीही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये देशविरोधी मजकूर शेअर करू देऊ नये. कारण यावर कारवाई केल्यावर ग्रुप अ‍ॅडमिनलाही अटक होऊन त्याला तुरुंगात जावे लागू शकते.

अशाच एका प्रकरणात उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात राहणार्‍या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनिनला अटक करण्यात आली आहे.

2. वैयक्तिक व्हिडिओ आणि प्रतिमा कधीही शेअर करू नका (Never share personal videos and images)
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये एखाद्याचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या
परवानगीशिवाय शेअर करणे गुन्हाच्या कक्षेत येते. असे केल्याने, फोटो
आणि व्हिडिओ शेअर करणार्‍या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते, मग तो ग्रुप अ‍ॅडमिन असो किंवा इतर कोणीही यूजर.

3. हिंसा भडकावणार्‍या पोस्ट शेअर करू नका (Do not share posts that incite violence)
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर एखाद्याने कोणत्याही धर्माचा अपमान करणारा व्हिडिओ किंवा फोटो शेअर केल्यास, हिंसाचार भडकावल्याबद्दल पोलीस त्याला अटक करू शकतात. (Responsibilities Of WhatsApp Group Admin)

4. फेक न्यूज शेअर करू नका (Don’t Share Fake News)
आजकाल लोक व्हॉट्सअ‍ॅपवर काहीही लिहून शेयर करतात. अलीकडेच याबाबत एक नवा नियम बनवण्यात आला आहे, ज्यानुसार फेक न्यूज आणि फेक अकाउंट्स चालवणार्‍यांविरोधात तक्रार केली तर अशी खाती बंद केली जाऊ शकतात.

5. या प्रकारचे व्हिडिओ शेअर करू नका (Do not share this type of video)
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अश्लील गोष्टी शेअर करणे गुन्ह्याच्या कक्षेत येते. व्हॉट्सअ‍ॅपवर चाईल्ड पोर्नोग्राफी, वेश्याव्यवसाय यासंबंधित मेसेज शेअर करणे हा गुन्हा आहे आणि असे केल्यास संबंधितांना तुरुंगवासाची तरतूद आहे.

Web Title :- Responsibilities Of WhatsApp Group Admin | if you are the admin of whatsapp group then read this news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

SBI Tax Saving Scheme | 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 6.53 लाख; सोबतच टॅक्स सवलतीचा फायदा

Dinkar Raikar Passes Away | ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे दीर्घ आजाराने निधन; DTP ऑपरेटरपासून सुरुवात करुन समूह संपादक म्हणून झाले होते निवृत्त

IPS Transfer Maharashtra | डॉ. भूषणकुमार उपाध्याय गृह रक्षक दलाचे नवे महासंचालक तर कुलवंत कुमार यांची ‘वाहतूक’च्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्ती

Leave A Reply

Your email address will not be published.