Disadvantages Of Sleeping Empty Stomach | सावधान ! उपाशी पोटी झोपणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक, होते ‘हे’ नुकसान; जाणून घ्या

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Disadvantages Of Sleeping Empty Stomach | निरोगी जीवनशैलीसाठी, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी न्याहारी राजाप्रमाने आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे, अशी एक म्हण आहे. या म्हणीच्या विरुद्ध, काही लोक रात्री न जेवता झोपी जातात, जे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. अनेक वजन जास्त असलेल्या लोकांना असा समज आहे की रात्री रिकाम्या पोटी झोपल्याने वजन कमी करता येते. आणि तुमचाही असाच विचार असेल तर तो गैरसमज आहे. वजन कमी करण्यासाठी डाएट गरजेच आहे पण रात्री हलका डिनर करणे सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे उपाशी राहून वजन कमी होण्यापेक्षा तुमच्या समस्यानमध्ये वाढ होऊ शकते. (Disadvantages Of Sleeping Empty Stomach)

चला जाणून घेऊया रात्री रिकाम्या पोटी झोपण्याचे तोटे (Disadvantages Of Sleeping Empty Stomach) –

1. निद्रानाश (Insomnia)
रात्री रिकाम्या पोटी झोपत असाल तर तुम्हाला झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपता तेव्हा मेंदू तुम्हाला जेवण्यासाठी अलर्ट करू लागतो, यामुळे सारखी सारखी झोप मोड होते. हळूहळू ही सवय बनते आणि तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ लागतो.

2. मेटाबोलिज्म बिघडते (Metabolism Deteriorates)
जर तुम्ही रात्रीचे जेवण वगळले किंवा खाण्याची पद्धत बरोबर नसेल तर तुमच्या मेटाबोलिज्मवर वाईट परिणाम होऊ शकतो. खाण्याची पद्धत चांगली नसेल किंवा योग्य वेळी डिनर घेतला नाही तर इन्सुलिनची पातळी बिघडू शकते. कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडची पातळी देखील बिघडू शकते. इन्सुलिन सोबतच तुमच्या हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. (Disadvantages Of Sleeping Empty Stomach)

3 . स्नायू कमजोर होतात (Muscles Become Weak)
जे लोक रात्री रिकाम्या पोटी झोपतात त्यांना स्नायू कमकुवत होण्याचा धोका असतो.
रिकाम्या पोटी झोपल्याने प्रथिने आणि अमीनो ऍसिडच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
स्नायूसाठी प्रोटीन खूप आवश्यक घटक आहे आणि प्रोटीनच्या बिघडलेल्या कार्यक्षमतेमुळे स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो.

4. शरीरात एनर्जी कमी होते (Body Loses Energy)
तुम्ही रात्री रिकाम्या पोटी झोपलात तर तुमची एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते.
यामुळे तुम्हाला अशक्तपणा आणि थकवा जाणवू शकतो. जर तुम्ही तुमची
ही सवय मोडली नाही तर नंतर तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या बनू शकते.

5. वजन वाढते (Weight Gain)
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक असे गृहीत धरतात की रात्रीचे जेवण टाळले तर वजन कमी होईल. परंतु प्रत्यक्षात, ते उलट कार्य करते. हे खरे आहे की रात्रीचे जेवण कमी प्रमाणात असले पाहिजे, परंतु जेवण पूर्णपणे वगळणे योग्य नाही. रात्री बराच वेळ काहीच खाल्ला नाही तर शरीर एका परिस्थितीत (Mode) प्रवेश करते जिथे शरीर चरबी जमा करण्यास सुरवात करते. शरीर ऊर्जा वाचवण्यास आणि इतर क्रियाकलापांसाठी वापरण्यास सुरवात करते, ज्यामुळे वजन वाढते. त्यामूळे रात्रीचे हलके फुलके जेवण किंवा डायटेशने सुचवलेले पदार्थ खावे.

Web Title :- Disadvantages Of Sleeping Empty Stomach | disadvantages of sleeping empty stomach upashi pot zopnyache dushparinam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आगामी 3 दिवस पाऊस कोसळणार; पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात सरी

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव

Leave A Reply

Your email address will not be published.