Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज सुरू होणार

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Maharashtra School Reopen | राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत सर्व स्तरातून मागणी होत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत राज्यातील शाळा पुन्हा सुरु (Maharashtra School Reopen) करण्यावर चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सोमवारपासून शाळा सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. कोरोनाचे सर्व नियम (Corona Rules) पाळून शाळा सुरु करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 

राज्यातील कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून बंद असलेली शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरु (Maharashtra School Reopen) करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत.
जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरु होतील.
पहिली ते बारावीचे सर्व वर्ग सुरु होणार असून शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title :-  Maharashtra School Reopen | omicron covid variant maharashtra thackeray government Schools and colleges from 1st to 12th will start in the state from 24th education minister varsha gaikwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Omicron Top Symptom | ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये दिसत असलेली सर्व 14 लक्षणे आली समोर; परंतु ‘या’ 5 लक्षणांनी पीडित आहेत बहुतांश लोक

Diabetes | सकाळी उशिरापर्यंत झोपणारी किशोरवयीन मुले मधुमेहाला पडू शकतात बळी, जाणून घ्या काय सांगते संशोधन

तुम्ही सुद्धा जास्त Paracetamol घेत आहात का?, वयाच्या हिशेबाने ‘हा’ आहे क्रोसीन,काल्पोल, डोलोचा योग्य डोस

Leave A Reply

Your email address will not be published.