Diabetes | सकाळी उशिरापर्यंत झोपणारी किशोरवयीन मुले मधुमेहाला पडू शकतात बळी, जाणून घ्या काय सांगते संशोधन

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Diabetes | रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हे केवळ प्रौढांसाठीच फायदेशीर नाही, तर ही सवय लहान मुलांनाही फायदेशीर ठरते. अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (Brigham Young University) च्या संशोधकांच्या मते, सकाळी उशिरापर्यंत झोपणार्‍या किशोरांना आळस, लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. (Diabetes)

किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेहाची कारणे :
किशोरवयीन मुलांमध्ये मधुमेह होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ते थकलेले असतात तेव्हा ऊर्जा मिळविण्यासाठी ते गोड पदार्थ खातात. संशोधनाची पडताळणी करण्यासाठी संशोधकांनी एक आठवडा किशोरवयीन मुलांच्या आहारचे निरीक्षण केले.

अभ्यासात सहभागी किशोरवयीन मुलांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या पद्धतींचा विचार करून संशोधकांनी असे निरीक्षण नोंदवले की, जी किशोरवयीन मुले एका आठवड्यात रात्री साडेसहा तास आणि दुसर्‍या आठवड्यात साडेनऊ तास झोपतात त्यांनी त्याच प्रमाणात कॅलरीज वापरल्या. (Diabetes)

या किशोरवयीन मुलांच्या आहारात फळे आणि भाज्यांचे प्रमाण कमी आणि अन्नाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

किशोरांसाठी झोप महत्त्वाची :
प्रमुख संशोधक डॉ. डुरासिओ यांच्या मते, किशोरवयीन मुलांमध्ये वाढता लठ्ठपणा हा एक आजार बनत चालला आहे, त्यामुळे खाण्यासोबतच झोपण्याच्या पद्धतींचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

पालकांनी किशोरवयीन मुलांचे वाढते वजन रोखायचे असेल, तर त्यांना पुरेशी झोप घेण्यास प्रवृत्त करा, तसेच त्यांच्या नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करा.

संशोधक काय म्हणातात :
अभ्यासात, संशोधकांना असे आढळले की थकलेल्या किशोरवयीन मुलांनी दिवसातून सरासरी 12 ग्रॅम जास्त साखर खाल्ली. अशा प्रकारे वर्षभरात 2.5 ते 3 किलो अतिरिक्त साखर त्यांच्या शरीरात पोहोचते, जी साखर लठ्ठपणाला कारणीभूत असते.

अभ्यासाचे प्रमुख लेखक, डॉ. कारा डुरासिओ म्हणतात की आपण किती खातो यावर नव्हे तर आपण काय खातो यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. संशोधकांच्या मते, जर आपण आहारात कार्बोहायड्रेट किंवा साखरेचे पदार्थ खाल्ल्यास शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. (Diabetes)

शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा होतो. अशा पदार्थांमुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते, त्यामुळे किशोरवयीन मुले लठ्ठपणाचे शिकार होतात.

मुलांमध्ये मधुमेहाची लक्षणे

1. तहान लागणे

2. वारंवार लघवीला होणे

3. भूक वाढणे आणि वजन कमी होणे

4. नेहमी थकवा आणि अशक्तपणा

5. यीस्ट संसर्ग

6. मूडमध्ये बदल

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, युनिसेफ आणि लोकसंख्या परिषदेने जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे
की 19 वर्षापर्यंतच्या 10 टक्के मुलांना मधुमेहपूर्व स्थिती आहे, ज्यांना नंतर मधुमेह होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे मुलांमधील मधुमेहाची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार करा.

Web Title :- Diabetes | the habit of sleeping late in the morning can make teenagers diabetes patients

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

तुम्ही सुद्धा जास्त Paracetamol घेत आहात का?, वयाच्या हिशेबाने ‘हा’ आहे क्रोसीन,काल्पोल, डोलोचा योग्य डोस

EPFO | 30 वर्षापेक्षा कमी वयात सुरू केली नोकरी आणि 18 हजारपेक्षा कमी असेल पगार तर निवृत्तीला किती मिळेल फंड, जाणून घ्या?

LIC Kanyadan Policy | LIC च्या कन्यादान पॉलिसीत दररोजच्या गुंतवणुकीवर मिळेल मोठी रक्कम, मिळू शकतात जवळपास 27 लाख

Leave A Reply

Your email address will not be published.