Control Uric Acid | यूरिक अ‍ॅसिड कंट्रोल करण्यासह सांधेदुखीत आराम देते ‘मेथी’, जाणून घ्या कसा करावा वापर

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम – Control Uric Acid | वयानुसार आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. संतुलित आहार आणि व्यायामामुळे तुमचे शरीर फिट राहण्यास मदत होते. आपली जीवनशैली अशी झाली आहे की आपण वेळेवर झोपत नाही, वेळेवर जेवत नाही, व्यायाम करत नाही, परिणामी आपल्याला त्रास देणारे अनेक आजार बळावतात. युरिक अ‍ॅसिड (Control Uric Acid ) वाढणे हा देखील असाच एक आजार आहे जो आपल्या खाण्यापिण्यामुळे वाढतो.

आपली खराब जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होणारा हा आजार आहे, ज्यामुळे भविष्यात मधुमेह (Diabetes)आणि रक्तदाबाचे (Blood Pressure) आजारही होऊ शकतात. पूर्वी हा आजार वृद्धांना होत असे, पण आता तरुणांनाही त्रास होत आहे.

शरीरातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण (uric acid level increased symptoms) वाढल्याने सांधेदुखी (Arthritis), सूज (Swelling)आणि जडपणा येतो. रेड मीट, सीफूड, मसूर, राजमा,
पनीर आणि तांदूळ यासारखे काही पदार्थ आहारात घेतल्याने युरिक अ‍ॅसिड वाढते.
आपल्या खाण्याच्या सवयी देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्यास कारणीभूत आहेत.
जास्त वेळ उपाशी राहणे हे देखील युरिक अ‍ॅसिड वाढण्याचे कारण आहे.

तुम्हालाही तुमच्या शरीरात अशी लक्षणे दिसत असतील तर ताबडतोब युरिक अ‍ॅसिडची चाचणी करून घ्या आणि आहारात बदल करा. युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी मेथीचे (Fenugreek) सेवन खूप उपयुक्त आहे. (Control Uric Acid)

मेथी आरोग्यासाठी फायदेशीर (Fenugreek is good for health)
फायबर, प्रोटीन, आयर्न भरपूर असलेली मेथी युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करते, तसेच आरोग्याची काळजी घेते.
दाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त मेथी शरीरातील सूज कमी करते.

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी करा मेथीचे सेवन (fenugreek to control uric acid) :
युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी अर्धा चमचा मेथी दाणे एक कप पाण्यात भिजत ठेवा.
हे पाणी सकाळी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी कोमट प्या.

तुम्ही प्रथिने आणि व्हिटॅमिन सी समृद्ध मेथीचे दाणे चावून खाऊ शकता.
हे खाल्ल्याने सांधेदुखी आणि युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे होणारी सूज दूर होईल.
हाडे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी मेथी खूप गुणकारी आहे.

Disclaimer : वरील मजकुरात नमूद सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. तो व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नये. काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title :- Control Uric Acid | fenugreek can control uric acid know the benefits for health and how to use it

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra School Reopen | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात 24 तारखेपासून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा-कॉलेज सुरू होणार

Omicron Top Symptom | ओमिक्रॉनच्या रूग्णांमध्ये दिसत असलेली सर्व 14 लक्षणे आली समोर; परंतु ‘या’ 5 लक्षणांनी पीडित आहेत बहुतांश लोक

Diabetes | सकाळी उशिरापर्यंत झोपणारी किशोरवयीन मुले मधुमेहाला पडू शकतात बळी, जाणून घ्या काय सांगते संशोधन

Leave A Reply

Your email address will not be published.