Post Office Small Saving Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून बनवू शकता 35 लाखापर्यंतची रक्कम, ही आहे पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Small Saving Scheme | आजकाल बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत, परंतु काहींना गुंतवणुकीच्या बाबतीत अजिबात धोका पत्करायचा नसतो. तुम्हालाही अशाच प्रकारे गुंतवणुकीत जोखीम नको असेल (Investment Withour Risk), तर पोस्ट ऑफिस (Post Office) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. येथे तुम्हाला गुंतवणुकीवर अनेक फायदे देखील दिले जातात. (Post Office Small Saving Scheme)
या योजनांमध्ये कर सवलतींसोबतच (Tax Benefit) इतरही अनेक फायदे दिले जातात. पोस्ट ऑफिस लहान बचत योजना ऑफर करते, ज्यामध्ये गुंतवणुकीवर जास्त रिटर्न दिला जातो. ग्रामस्थांसाठी पोस्ट ऑफिस ग्रामीण सुरक्षा योजना (Gram Suraksha Scheme) आहे. या योजनेअंतर्गत 35 लाखांपर्यंतची रक्कम मिळू शकते.
गावातील लोकसंख्येसाठी ही योजना 1995 मध्ये सुरू झाली, जी ग्रामस्थांना विमा संरक्षण देते. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, जास्तीत जास्त ग्रामस्थांना लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. यासोबतच त्यांचा विमाही या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे. किमान 19 वर्षे वय असलेला गुंतवणूकदार या योजनेत सहभागी होऊ शकतो, तर 55 वर्षांपेक्षा जास्त वय नसलेली व्यक्ती याचा लाभ घेऊ शकते. या योजनेंतर्गत वार्षिक किमान 10,000 रुपये आणि कमाल 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. (Post Office Small Saving Scheme)
योजनेचे ठळक मुद्दे
या योजनेअंतर्गत वयाच्या 80 व्या वर्षीही बोनसचा लाभ दिला जातो.
गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास, संपूर्ण पैसे नॉमिनीला हस्तांतरित केले जातात.|
या योजनेत, तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर
प्रीमियम भरू शकता. या अंतर्गत, प्रीमियम जमा करण्यासाठी वाढीव कालावधी देखील दिला जातो. ग्राम सुरक्षा विमा योजनेंतर्गत कोणताही गुंतवणूकदार तीन वर्षांनंतर त्याचे खाते सरेंडर करू शकतो.
35 लाख रुपये कसे मिळतील ?
जर एखाद्याने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली,
तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षासाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी
1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. या अंतर्गत पॉलिसी
घेणार्यांना 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटीवर दिले जातात.
Web Title :- Post Office Small Saving Scheme | post office gram suraksha scheme you can make amount up to 35 lakhs know detail